agriculture news in Marathi reshim kosh producers will get subsidy Maharashtra | Page 2 ||| Agrowon

राज्यातील रेशीम कोष उत्पादकांना मिळणार अनुदान

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

बदलत्या हवामानामुळे अडचणीत येत असलेल्या रेशीम उद्योगाला दिलासा देण्यासाठी रेशीम कोषाला  प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

पुणे ः बदलत्या हवामानामुळे अडचणीत येत असलेल्या रेशीम उद्योगाला दिलासा देण्यासाठी रेशीम कोषाला  प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजनेतून सी. बी. वाणाच्या कोषास प्रतिकिलो ३० रूपये आणि बायव्होल्टाईन वाणाच्या कोषास ५० रूपये अनुदान मिळणार आहे. हे अनुदान १३ जुलैपासून मिळणार असून रेशीम कोष उत्पादकांना दिलासा मिळेल.

रेशीम उद्योगाला राज्याच्या अर्थव्यवस्थेत केंद्रस्थानी आणण्यासाठी नवीन वस्त्रोद्योग धोरण २०१८ ते २०२३ मध्ये अनेक उपाययोजना करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत रेशीम कोषास उत्पादनावर आधारित प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याचा प्रस्ताव रेशीम संचालकांनी शासनास सादर केला होता. त्याला शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये सी. बी. वाणाच्या कोषास प्रतिकिलो ३० रूपये, तर बायव्होल्टाईन कोषास ५० रूपये अनुदान देण्यात येणार आहे. त्यासंदर्भात कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.  

शेतकऱ्याचे अनुदानाचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर संबंधित रेशीम विकास अधिकाऱ्यांनी ते तपासून उपसंचालक, साहाय्यक संचालक, प्रादेशिक रेशीम कार्यालय यांची मान्यता घ्यावी. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यासाठी आवश्यक निधी जिल्हाधिकारी यांच्याकडून उपलब्ध करून घेऊन शेतकऱ्यांना अनुदान वितरित करावे.

जिल्हा वार्षिक योजनेमध्ये उत्पादनावर आधारित कोष अनुदानाची आवश्यक तरतूद करून घेण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा रेशीम अधिकाऱ्यांची राहणार आहे. या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना प्रोत्साहनात्मक अनुदान थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) नुसार महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा करणे बंधनकारक आहे.

या बाजारपेठांमध्ये करावी विक्री
रेशीम उत्पादकांना अनुदान मिळण्यासाठी रेशीम कोषांची विक्री रेशीम संचालनालयाने मान्यता दिलेल्या कोषांच्या बाजार पेठेतच करावी लागणार आहे. त्यासाठी संचालनालयाने जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती (जि. पुणे) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, पूर्ण (जि. परभणी) कृषी उत्पन्न बाजार समिती, पैठण (जि. औरंगाबाद) तालुक्यातील पाचोज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कोषांची विक्री करणे बंधनकारक केले आहे.

अनुदान योजनेची अशी असेल कार्यपद्धती

 • ऑनलाइन नोंदणी बंधनकारक
 • तुती लागवडीची सात-बारावर नोंद आवश्यक
 • अंडीपूंज, चॉकी अळ्या ह्या शासनमान्य संस्था, सेंटरकडून घेणे आवश्यक 
 • संगणकीकृत बारकोड असलेल्या पासबुकमध्ये बॅचवाईज अंडीपुंज, चॉकी व कोष उत्पादनांची नोंद ठेवावी
 • १०० अंडीपुंजाला ५५ किलो कोष किमान उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार
 • डबल, डागाळलेल्या व पोचट कोषास अनुदान देय राहणार नाही
 • परराज्यातून आवक झालेल्या व व्यापाऱ्यांना कोषासाठी ही योजना लागू राहणार नाही.
 • कोष विक्रीची रक्कम रोखीने अदा केल्यास अनुदान अनुज्ञेय राहणार नाही.
 • कोष विक्रीची मूळ पावती, जमा रकमेची नोंद असलेल्या बँक पासबुकची छायाप्रत रेशीम कार्यालयाकडे सादर करावी
 • अनुदानाची रक्कम निश्चित करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा रेशीम विकास अधिकारी यांची राहील  
 • जास्तीत जास्त ८० किलोपर्यंत अनुदान मिळणार
 • संचालनालयाने ठरवून दिलेल्या सी.बी. कोषांना प्रतिकिलो २८० रुपये व बी.व्ही. कोषांना ३०० रूपयांपेक्षा कमी दर मिळल्यानंतरच अनुदान दिले जाईल.
 • रेशीम कोषाचे अनुदान वर्षातून नोव्हेंबर व फेब्रुवारी या दोन महिन्यांत दिले जाईल.
   

इतर अॅग्रो विशेष
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...
वऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...
मध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...
पावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...
सांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...
`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...