कोल्हापूर बाजार समिती संचालकांचे राजीनामे

बेकायदेशीर नोकर भरती तसेच जागा हस्तांतरण व्यवहार प्रकरणी बाजार समितीची चौकशी सुरू असतानाच सोमवारी (ता. ३) सायंकाळी १५ संचालकांनी राजीनामे दिल्याने बाजार समिती वर्तुळात खळबळ उडाली.
कोल्हापूर बाजार समिती संचालकांचे राजीनामे
कोल्हापूर बाजार समिती संचालकांचे राजीनामे

कोल्हापूर : बेकायदेशीर नोकर भरती तसेच जागा हस्तांतरण व्यवहार प्रकरणी बाजार समितीची चौकशी सुरू असतानाच सोमवारी (ता. ३) सायंकाळी १५ संचालकांनी राजीनामे दिल्याने बाजार समिती वर्तुळात खळबळ उडाली. दरम्यान शासन नियुक्त संचालकांनी प्रशासक म्हणून आपली नियुक्ती करावी, अशी मागणी केल्याने आता या प्रकरणाबाबत औत्सुक्य निर्माण झाले आहे. गेल्या वर्षी २४ जागांसाठी बाजार समितीत भरती प्रक्रिया होणार होती. त्यासाठी चार हजारांवर अर्ज आले होते. ते अर्ज बाजूला ठेवून संचालक मंडळातील बहुतांशींनी जवळच्या नातेवाईकांचीच येथे भरती केल्याचा आरोप झाला आहे. बाजार समितीतील काही जागा आर्थिक तोट्यातच भाडेतत्त्वावर देण्यासाठी हालचाली झाल्या. बेकायदेशीरपणे गाळे बांधकामासाठी हालचाली सुरू झाल्या. या सर्वांबाबत बाजार समितीतील शिवसेनेचे प्रतिनिधित्व करणारे संचालक ॲड. किरण पाटील, शेतकरी प्रतिनिधी भगवान काटे तसेच शासन नियुक्त माजी संचालक नाथाजी पाटील यांनी जिल्हा निबंधकांकडे तक्रार केली होती. या पार्श्‍वभूमीवर बाजार समिती संचालक मंडळाने केलेल्या कारभाराची चौकशी अधिकाऱ्यांच्या त्रिसदस्यीय समितीकडून सुरू झाली. ती जवळपास पूर्ण झाली आहे. त्याचा अहवाल सोमवारी (ता. ३) सादर होणार होता. या पार्श्वभूमीवर हे राजीनामे देण्यात आले आहेत. या विद्यमान संचालक मंडळाची मुदत पुढील आठवड्यात संपणार आहे. नंदकुमार वळंजू, विलास साठे, उदयसिंह पाटील, उत्तम धुमाळ, शेखर एडगे, अमित कांबळे, आशालता पाटील, सदानंद कोरगावकर, बाबा लाड, कृष्णात पाटील, सर्जेराव पाटील, परशुराम खुडे, बाबुराव खोत आदींनी राजीनामे दिले आहेत. दरम्यान सभापती दशरथ माने, उपसभापती संगिता पाटील, शिवसेनेचे संचालक संजय जाधव, शशिकांत आडनाईक आदींनी राजीनामे दिलेले नाहीत. सभापती व उपसभापती यांचे राजीनामे मंगळवारी (ता. ४) देण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, दुपारपर्यंत अद्याप या बाबत अधिकृत माहिती मिळाली नाही.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com