agriculture news in Marathi resign of Kolhapru APMC directors Maharashtra | Agrowon

कोल्हापूर बाजार समिती संचालकांचे राजीनामे

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

बेकायदेशीर नोकर भरती तसेच जागा हस्तांतरण व्यवहार प्रकरणी बाजार समितीची चौकशी सुरू असतानाच सोमवारी (ता. ३) सायंकाळी १५ संचालकांनी राजीनामे दिल्याने बाजार समिती वर्तुळात खळबळ उडाली. 

कोल्हापूर : बेकायदेशीर नोकर भरती तसेच जागा हस्तांतरण व्यवहार प्रकरणी बाजार समितीची चौकशी सुरू असतानाच सोमवारी (ता. ३) सायंकाळी १५ संचालकांनी राजीनामे दिल्याने बाजार समिती वर्तुळात खळबळ उडाली. दरम्यान शासन नियुक्त संचालकांनी प्रशासक म्हणून आपली नियुक्ती करावी, अशी मागणी केल्याने आता या प्रकरणाबाबत औत्सुक्य निर्माण झाले आहे.

गेल्या वर्षी २४ जागांसाठी बाजार समितीत भरती प्रक्रिया होणार होती. त्यासाठी चार हजारांवर अर्ज आले होते. ते अर्ज बाजूला ठेवून संचालक मंडळातील बहुतांशींनी जवळच्या नातेवाईकांचीच येथे भरती केल्याचा आरोप झाला आहे. बाजार समितीतील काही जागा आर्थिक तोट्यातच भाडेतत्त्वावर देण्यासाठी हालचाली झाल्या. बेकायदेशीरपणे गाळे बांधकामासाठी हालचाली सुरू झाल्या. या सर्वांबाबत बाजार समितीतील शिवसेनेचे प्रतिनिधित्व करणारे संचालक ॲड. किरण पाटील, शेतकरी प्रतिनिधी भगवान काटे तसेच शासन नियुक्त माजी संचालक नाथाजी पाटील यांनी जिल्हा निबंधकांकडे तक्रार केली होती.

या पार्श्‍वभूमीवर बाजार समिती संचालक मंडळाने केलेल्या कारभाराची चौकशी अधिकाऱ्यांच्या त्रिसदस्यीय समितीकडून सुरू झाली. ती जवळपास पूर्ण झाली आहे. त्याचा अहवाल सोमवारी (ता. ३) सादर होणार होता. या पार्श्वभूमीवर हे राजीनामे देण्यात आले आहेत.

या विद्यमान संचालक मंडळाची मुदत पुढील आठवड्यात संपणार आहे. नंदकुमार वळंजू, विलास साठे, उदयसिंह पाटील, उत्तम धुमाळ, शेखर एडगे, अमित कांबळे, आशालता पाटील, सदानंद कोरगावकर, बाबा लाड, कृष्णात पाटील, सर्जेराव पाटील, परशुराम खुडे, बाबुराव खोत आदींनी राजीनामे दिले आहेत.

दरम्यान सभापती दशरथ माने, उपसभापती संगिता पाटील, शिवसेनेचे संचालक संजय जाधव, शशिकांत आडनाईक आदींनी राजीनामे दिलेले नाहीत. सभापती व उपसभापती यांचे राजीनामे मंगळवारी (ता. ४) देण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, दुपारपर्यंत अद्याप या बाबत अधिकृत माहिती मिळाली नाही.
 


इतर बातम्या
पुणे विभागात खरीप कांद्याची ४० हजार...पुणे ः खरिपात अति पावसामुळे कांद्याचे नुकसान...
सोलापूर जिल्ह्यात पीक विमा नुकसान...सोलापूर : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
नुकसान भरपाई देण्यास सरकार कटिबद्ध :...औरंगाबाद  : ‘‘आता झालेल्या पावसाने...
कांदा बियाणे मिळवण्यासाठी अकोल्यात...अकोला ः रब्बी कांदा लागवडीची लगबग सुरु झाली...
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा...लातूर ः या वर्षी सुरवतीपासून चांगला पाऊस होत...
जळगाव जिल्ह्यात मक्याची ९० हजार...जळगाव  ः खानदेशात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा...
आजरा तालुक्‍यात भात कापणी सुरूआजरा, जि. कोल्हापूर ः आजरा तालुक्‍यात भात...
कारखानदारांना वाढत्या साखर साठ्याची...मुंबई  : राज्यात गेल्या गाळप हंगामातील ७२...
धानावरील तुडतुड्यांचे वेळीच व्यवस्थापन...नागपूर  : ‘‘सद्यास्थितीत पूर्व विदर्भात...
‘बाभळी’तील पाणी अडविण्यासाठी प्रयत्न...नांदेड : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीकविम्यासाठी कंपनीकडे...नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पुराच्या...
जायकवाडी प्रकल्पातून ५५ टीएमसी पाण्याचा...औरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून गत २५...
सांगली जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन...सांगली ः जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा...
आता खुल्या मिठाईवरही ‘वापर कालावधी’...नागपूर  : मिठाईच्या दुकानातील ‘ट्रे’ वर...
कुलगुरू निवड निकषांबाबत प्र-कुलपतींच्या...पुणे : कुलगुरू निवड निकषांच्या बदलाबाबत कुलपती...
मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांना...मुंबई : विदर्भातील पुरापाठोपाठ मराठवाड्यातील...
कापूस खरेदीचे प्रभावी नियोजन करावे ः...मुंबई : आगामी हंगामामध्ये राज्यात सुमारे ४५० लाख...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कार्यान्वित...मुंबई : लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार...
सीमाभागातील साखर कारखान्यांचे मजूर...कोल्हापूर : जिल्ह्यात ऊस तोडणी मजुरांचे आगमन होत...
जळगावात उडदाला ७५०० रुपये क्विंटल दरजळगाव  ः एकीकडे अतिपावसाने उडदाचे मोठे...