Agriculture news in marathi Resolution of 86 Gram Panchayats for solar project | Agrowon

सौर प्रकल्पासाठी ८६ ग्रामपंचायतींचे ठराव 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 एप्रिल 2021

सौर प्रकल्पांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आवाहन ग्रामपंचायतींना करण्यात आले होते. त्यानुसार विदर्भातील ५६ ग्रामपंचायतींनी तब्बल ८८९ एकर जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवीत, तसा ठराव महावितरणकडे सादर केला आहे. 

नागपूर : महा कृषी ऊर्जा धोरणांतर्गत शेतीला सौरऊर्जा प्रकल्पातून दिवसा वीज देण्यावर भर दिला जात आहे. सौर प्रकल्पांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आवाहन ग्रामपंचायतींना करण्यात आले होते. त्यानुसार विदर्भातील ५६ ग्रामपंचायतींनी तब्बल ८८९ एकर जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवीत, तसा ठराव महावितरणकडे सादर केला आहे. 

शेतीला दिवसा वीजपुरवठ्याची शेतकऱ्यांची जुनी मागणी आहे. त्यासाठी सौर प्रकल्प हाच सर्वांत किफायतशीर व शाश्‍वत पर्याय आहे. यामुळेच राज्य सरकारने सौर प्रकल्प कार्यान्वित करून सौर वाहिन्यांद्वारे शेतीला दिवसा वीजपुरवठ्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यात विविध ठिकाणी ३३२ मेगावॉट क्षमतेचे सौर प्रकल्प कार्यान्वित झाले असून, येथून वीजपुरवठा होणाऱ्या ८६ वाहिन्यांवरील सुमारे ३८ हजार कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा होऊ लागला आहे. कार्यान्वित झालेल्या प्रकल्पांमध्ये खापा येथील प्रकल्प पथदर्शी ठरला आहे. 

या योजनेची यशस्विता लक्षात घेता राज्याच्या कृषी ऊर्जा धोरणातही त्याचा समावेश करण्यात आला आहे. सौर प्रकल्पांसाठी मोठ्या जागेची गरज असते, यामुळे महावितरणकडून ग्रामपंचायतींना जागा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील २४२ गावांनी एकूण ३ हजार ९९८ एकर जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भातील ठराव महावितरणकडे सादर केले आहे. त्यात औरंगाबाद प्रादेशिक विभाग सर्वात आघाडीवर असून, त्या पाठोपाठ नागपूर प्रादेशिक विभाग, अर्थात विदर्भाचा क्रमांक लागतो. सध्या जागांची पाहणी करून अर्ज मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. 
 
ग्रामपंचायतींना मिळणार उत्पन्न 
सिंचनासाठी ५ हजार २०० मेगावॉट सौरऊर्जानिर्मितीचे महावितरणचे लक्ष्य आहे. त्यासाठी दोन ते दहा मेगावॉट क्षमतेच्या अनेक विकेंद्रित प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार आहे. प्रकल्पांसाठी वीज उपकेंद्रांच्या ५ किमी परिघात कमीत कमी १०, तर जास्तीत जास्त ५० एकर शासकीय व खासगी जमिनी भाडेपट्टीवर घेण्यात येत आहेत. राज्य शासनाने आपल्या जमिनी एक रुपया भाडेपट्टीवर ३० वर्षांसाठी देऊ केल्या आहेत. शिवाय वैयक्तिक, समूह गट, सहकारी संस्था तसेच ग्रामपंचायतींच्या मालकीच्या जमिनींसाठी प्रतिएकर प्रतिवर्ष ३० हजार रुपये भाडे देण्यात येणार आहे. म्हणजेच ग्रामपंचायतींना पडीक जागा देऊन उत्पन्न मिळविण्याची संधी आहे. 


इतर ताज्या घडामोडी
अलमट्टीवर आधुनिक रियल टाइम डाटा यंत्रणा...कोल्हापूर : पूरपरस्थितीचा सामना करण्यासाठी...
अकलूज नगरपालिकेच्या मागणीसाठी माळशिरसला...सोलापूर : अकलूज येथे नगरपालिका व नातेपुते येथे...
ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून तिवसा शहराला...अमरावती : ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून तिवसा शहरासाठी...
नांदेडमध्ये पीककर्ज वाटप संथ; ... नांदेड : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ११६८ कोटी...
टोमॅटोचे दर उतरले; शेतकरी संतप्तनारायणगाव, जि. पुणे :  जुन्नर कृषी उत्पन्न...
आठवड्यात मध्यम ते हलक्‍या पावसाची शक्‍...या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी आणि पावसातील...
‘एक गाव, एक वाण’साठी कारंजातील नऊ...वाशीम : राज्य शासनाच्या बाळासाहेब ठाकरे कृषी...
‘ताकारी’च्या लाभक्षेत्राची ड्रोनद्वारे...सांगली : ताकारी उपसा सिंचन योजनेच्या क्षेत्रातील...
खानदेशात पेरण्या रखडत; कमी पावसामुळे...जळगाव : खानदेशात खरिपातील पिकांच्या पेरणीला रखडत...
निम्न दुधना प्रकल्पात वाढली पाण्याची आवकपरतूर, जि. जालना : यंदा पावसाळा सुरू होताच पाऊस...
ब्रह्मगिरी पर्वतावर अवैध उत्खनन;...नाशिक : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या...
अमरावती विभागात कर्जवाटपात...यवतमाळ : पीककर्ज वाटपासाठी शासनाने बँकांना...
आदिवासींच्या जमिनींचा शोध घेण्यासाठी ‘...बुलडाणा : संग्रामपूर तालुक्यातील चिचारी येथील...
यवतमाळमध्ये ६५ लाखांचे बोगस बीटी...यवतमाळ : जिल्ह्यात खरिपाची लगबग सुरू आहे. याचा...
काळ्याफिती लावून किसानपुत्रांचे आंदोलनआंबेजोगाई, जि. बीड : किसानपुत्र आंदोलनाच्या...
हमीभावाने एक हजार क्विंटल मका खरेदीऔरंगाबाद : आधारभूत किमतीने शेतीमाल खरेदी...
नांदेडमध्ये खरीप पेरणी सुरूनांदेड : जिल्ह्यात जून महिन्याच्या प्रारंभापासून...
पुणे जिल्ह्यातील आठवडी बाजार बंदचपुणे : ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्थेचा कणा असलेले...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत तीन...औरंगाबाद : यंदाच्या खरीप हंगामात १५ जून...
जळगाव जिल्ह्यातील कृषी केंद्रांची तपासणीजळगाव ः जिल्ह्यात कृषी केंद्रांमधील बियाणे साठा,...