दूधदरप्रश्‍नी वैजापूर बाजार समितीच्या विशेष सभेत ठराव

औरंगाबाद : दूध उत्पादकांच्या मागण्याच्या समर्थनार्थ मंगळवारी (ता. २२) वैजापूर बाजार समितीने विशेष सभा घेऊन ठराव पारित केला आहे.
Resolution in the special meeting of Vaijapur market committee on milk price issue
Resolution in the special meeting of Vaijapur market committee on milk price issue

औरंगाबाद : दूध उत्पादकांच्या मागण्याच्या समर्थनार्थ मंगळवारी (ता. २२) वैजापूर बाजार समितीने विशेष सभा घेऊन ठराव पारित केला आहे. गाईच्या दुधाला कमीत कमी ३० रुपये प्रतिलिटर व म्हशीच्या दुधाला कमीत कमी ४० रुपये प्रतिलिटर दर मिळावा, या विषयी ठराव घेण्यात आला. 

मागणी घटल्याचे कारण देत खासगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर १० ते १५ रुपये प्रति लिटरने पाडले आहेत. ग्राहकांसाठीचे विक्री दर मात्र तसेच ठेवत शेतकरी व ग्राहकांची प्रचंड लूटमार केल्याचा आरोप करत दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती किसान सभा व इतर समविचारी शेतकरी संघटनांनी या लुटमारीविरोधात राज्यात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

दूध उत्पादकांची लूटमार करता येणार नाही. या साठी खासगी व सहकारी दूध संघांना लागू होईल, असा कायदा करा आदी महत्त्वपूर्ण ठराव लाखगंगा येथे ग्रामसभेत घेण्यात आले. मंगळवारी वैजापूर बाजार समितीने सभापती भागीनाथ शहादराव मगर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेतली. 

दूध उत्पादकांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ सर्व संचालकांच्या सहमतीने बाजार समितीने ठराव घेतला आहे. शासनापर्यंत ठरवासह दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्याचा पाठपुरावा केला जाईल. - भागीनाथ शहादराव मगर, सभापती, वैजापूर बाजार समिती. 

वैजापूर तालुक्यातच नव्हे तर राज्यातील दूध उत्पादकांची होणारी ससेहोलपट थांबावी ही इच्छा आहे. त्यामुळे आपण विशेष सभेत ही सूचना मांडली. त्याला सभापतींसह सर्व संचालकांनी एकमताने सहमती दर्शविली. - राजेंद्र कराळे, संचालक, वैजापूर बाजार समिती.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com