agriculture news in marathi Resolution in the special meeting of Vaijapur market committee on milk price issue | Agrowon

दूधदरप्रश्‍नी वैजापूर बाजार समितीच्या विशेष सभेत ठराव

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 जून 2021

औरंगाबाद : दूध उत्पादकांच्या मागण्याच्या समर्थनार्थ मंगळवारी (ता. २२) वैजापूर बाजार समितीने विशेष सभा घेऊन ठराव पारित केला आहे.

औरंगाबाद : दूध उत्पादकांच्या मागण्याच्या समर्थनार्थ मंगळवारी (ता. २२) वैजापूर बाजार समितीने विशेष सभा घेऊन ठराव पारित केला आहे. गाईच्या दुधाला कमीत कमी ३० रुपये प्रतिलिटर व म्हशीच्या दुधाला कमीत कमी ४० रुपये प्रतिलिटर दर मिळावा, या विषयी ठराव घेण्यात आला. 

मागणी घटल्याचे कारण देत खासगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर १० ते १५ रुपये प्रति लिटरने पाडले आहेत. ग्राहकांसाठीचे विक्री दर मात्र तसेच ठेवत शेतकरी व ग्राहकांची प्रचंड लूटमार केल्याचा आरोप करत दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती किसान सभा व इतर समविचारी शेतकरी संघटनांनी या लुटमारीविरोधात राज्यात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

दूध उत्पादकांची लूटमार करता येणार नाही. या साठी खासगी व सहकारी दूध संघांना लागू होईल, असा कायदा करा आदी महत्त्वपूर्ण ठराव लाखगंगा येथे ग्रामसभेत घेण्यात आले. मंगळवारी वैजापूर बाजार समितीने सभापती भागीनाथ शहादराव मगर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेतली. 

दूध उत्पादकांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ सर्व संचालकांच्या सहमतीने बाजार समितीने ठराव घेतला आहे. शासनापर्यंत ठरवासह दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्याचा पाठपुरावा केला जाईल.
- भागीनाथ शहादराव मगर, सभापती, वैजापूर बाजार समिती. 

वैजापूर तालुक्यातच नव्हे तर राज्यातील दूध उत्पादकांची होणारी ससेहोलपट थांबावी ही इच्छा आहे. त्यामुळे आपण विशेष सभेत ही सूचना मांडली. त्याला सभापतींसह सर्व संचालकांनी एकमताने सहमती दर्शविली.
- राजेंद्र कराळे, संचालक, वैजापूर बाजार समिती.
 


इतर बातम्या
पशुचिकित्सा व्यवसायी आंदोलनाने पशुसेवा...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
अमरावती जिल्ह्यात १८३ जणांना ...अमरावती ः २०१७-१८ मध्ये फवारणीदरम्यान विषबाधेत...
पीकविम्यातील सूचनांचा केंद्राकडून...पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेत विमा कंपन्यांच्या...
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी साडेअकरा हजार...मुंबई ः राज्यातील विविध जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे...
कोकणात काही ठिकाणी मुसळधार पुणे : कोकणात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस...
निविष्ठा वितरणातील अडचणींत लक्ष घालणार...पुणे ः राज्यात निविष्ठा वितरणात अडचणी येत असल्यास...
मराठवाड्यात सव्वा लाख हेक्टरवरील...औरंगाबाद : मराठवाड्यातील सात जिल्ह्यांतील १००३...
गोंदिया जिल्ह्यात विमाधारक शेतकरी...गोंदिया : गेल्या वर्षी जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात...
साखरेचे किमान विक्री मूल्य तातडीने...कोल्हापूर : सध्या साखर उद्योग संकटात असून,...
वर्धा : पीककर्जप्रकरणी १६ बॅंकांना नोटीसवर्धा : पीककर्ज वाटपात दरवर्षी प्रमाणे या वर्षी...
आपद्‌ग्रस्त कुटुंबांना मिळणार पाच हजाररत्नागिरी : अतिवृष्टीचा सर्वाधिक तडाखा चिपळूण,...
पूरबाधित कर्जदारांना सहकार्याची भूमिका...कोल्हापूर : जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे नागरिक व...
सेंद्रिय शेतीचे तंत्र अंगीकारा ः डॉ. ढवणबदनापूर, जि. जालना : अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित...
अकोल्यात ३७ हजार हेक्टरचे पंचनामेअकोला : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या झालेल्या...
रुग्णालयांच्या सुरक्षेचा तपशील दाखल करा...मुंबई : रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी आतापर्यंत...
परभणीत पशुधन पदविकाधारकांचे आंदोलनपरभणी ः पशुधन पदवीधारकांची जिल्हास्तरावर नोंदणी...
सातारा :बेसुमार वृक्षतोडीमुळे कोयनेचे...सातारा : कोयना धरण परिसरात मोठ्या प्रमाणात...
‘महसूल’ लोकाभिमुख करा ः आयुक्त गमेनाशिक : प्रशासनात चांगले काम केल्यास समाज देवत्व...
मोहोळ, उत्तर सोलापुरात बिबट्याची दहशत...सोलापूर ः चिंचोली, शिरापूर (ता. मोहोळ) अकोलेकाटी...
लासलगाव बाजार समितीत टोमॅटो लिलावास...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प.पू...