agriculture news in marathi Resolution on two thousand for Satara District Bank | Agrowon

सातारा जिल्हा बॅंकेसाठी दोन हजारांवर ठराव

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी सोसायटीसह इतर मतदारसंघांतून ठराव करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. सहा मतदारसंघांसाठी ११ तालुक्‍यांतून तब्बल २०१३ ठराव प्राप्त झाले आहेत.

सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी सोसायटीसह इतर मतदारसंघांतून ठराव करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. सहा मतदारसंघांसाठी ११ तालुक्‍यांतून तब्बल २०१३ ठराव प्राप्त झाले आहेत. त्यामुळे उपनिबंधक कार्यालयाने आता सर्व माहिती जिल्हा बॅंकेकडे सुपूर्द केली आहे. 

येत्या १२ मार्चला कच्ची मतदार यादीची प्रसिद्धी होईल. त्या वेळीच नेमके कोणाचे कोठून व किती ठराव आलेत हे समजणार आहे. त्यानंतर मतदार यादीवर हरकती, सुनावणी होऊन पाच एप्रिलला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम १५ मेच्या दरम्यान सुरू होणार आहे.

अकरा तालुक्‍यांतून सोसायट्यांतून ९६४, नागरी बॅंका, पतसंस्थांतून ३८०, गृहनिर्माणमधून ३०७, औद्योगिक विणकरमधून ३२१, खरेदी- विक्री संघातून ११, कृषी प्रक्रिया मतदारसंघातून ३० ठरावांचा समावेश आहे. सर्वाधिक ठराव सातारा तालुक्‍यातून आहेत. 

सोसायटी मतदारसंघातील ठराव असे :

सातारा १४६, कऱ्हाड १४५, वाई ५९, पाटण १०५, महाबळेश्‍वर ११, जावळी ५१, खटाव १०३, माण ७४, कोरेगाव ९०, खंडाळा ५१, फलटण १२९. नागरी बॅंका मतदारसंघासाठी : सातारा ९४, कऱ्हाड ७०, वाई ३१, पाटण २९, महाबळेश्‍वर १४, जावळी सात, खटाव १८, माण २४, कोरेगाव २१, खंडाळा १५, फलटण ५७. गृहनिर्माणमधून सातारा १२२, कऱ्हाड ६७, वाई १५, पाटण ४५, महाबळेश्‍वर १४, जावळी तीन, खटाव चार, माण चार, कोरेगाव नऊ, खंडाळा नऊ, फलटण १५. 

औद्योगिक विणकर संस्थेतून सातारा ७९, कऱ्हाड ४८, वाई २४, पाटण ३२, महाबळेश्‍वर नऊ, जावळी आठ, खटाव २३, माण १६, कोरेगाव १०, खंडाळा १२, फलटण ६०. खरेदी- विक्री संघ : सातारा दोन, महाबळेश्‍वर शून्य व उर्वरित तालुक्‍यातून प्रत्येकी एक ठराव. कृषी प्रक्रिया मतदारसंघ : सातारा आठ, कऱ्हाड पाच, वाई दोन, पाटण व महाबळेश्‍वर प्रत्येकी एक, जावळी तीन, खटाव एक, माण व कोरेगाव शून्य, खंडाळा एक, 
फलटण आठ. 

ठरावाची प्रक्रिया पूर्ण 

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी ठराव करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. जिल्हा बॅंकेकडून कच्ची मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावरच कोणाचे किती ठराव झाले ते समजेल. सध्या उपनिबंधक कार्यालयाने सोसायटींसह इतर पाच मतदारसंघांतून ठरावाची प्रक्रिया पूर्ण केली.


इतर ताज्या घडामोडी
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
डाळिंब अंबिया बहरातील कीड- रोग...डाळिंब बागेत विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...
पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी...पुणे : गेल्या दीड महिन्यापासून उन्हाच्या झळा...
कोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन...नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक परिस्थिती...
पालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या...येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून...