हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८ हजार ४०३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.
ताज्या घडामोडी
सातारा जिल्हा बॅंकेसाठी दोन हजारांवर ठराव
सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी सोसायटीसह इतर मतदारसंघांतून ठराव करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. सहा मतदारसंघांसाठी ११ तालुक्यांतून तब्बल २०१३ ठराव प्राप्त झाले आहेत.
सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी सोसायटीसह इतर मतदारसंघांतून ठराव करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. सहा मतदारसंघांसाठी ११ तालुक्यांतून तब्बल २०१३ ठराव प्राप्त झाले आहेत. त्यामुळे उपनिबंधक कार्यालयाने आता सर्व माहिती जिल्हा बॅंकेकडे सुपूर्द केली आहे.
येत्या १२ मार्चला कच्ची मतदार यादीची प्रसिद्धी होईल. त्या वेळीच नेमके कोणाचे कोठून व किती ठराव आलेत हे समजणार आहे. त्यानंतर मतदार यादीवर हरकती, सुनावणी होऊन पाच एप्रिलला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम १५ मेच्या दरम्यान सुरू होणार आहे.
अकरा तालुक्यांतून सोसायट्यांतून ९६४, नागरी बॅंका, पतसंस्थांतून ३८०, गृहनिर्माणमधून ३०७, औद्योगिक विणकरमधून ३२१, खरेदी- विक्री संघातून ११, कृषी प्रक्रिया मतदारसंघातून ३० ठरावांचा समावेश आहे. सर्वाधिक ठराव सातारा तालुक्यातून आहेत.
सोसायटी मतदारसंघातील ठराव असे :
सातारा १४६, कऱ्हाड १४५, वाई ५९, पाटण १०५, महाबळेश्वर ११, जावळी ५१, खटाव १०३, माण ७४, कोरेगाव ९०, खंडाळा ५१, फलटण १२९. नागरी बॅंका मतदारसंघासाठी : सातारा ९४, कऱ्हाड ७०, वाई ३१, पाटण २९, महाबळेश्वर १४, जावळी सात, खटाव १८, माण २४, कोरेगाव २१, खंडाळा १५, फलटण ५७. गृहनिर्माणमधून सातारा १२२, कऱ्हाड ६७, वाई १५, पाटण ४५, महाबळेश्वर १४, जावळी तीन, खटाव चार, माण चार, कोरेगाव नऊ, खंडाळा नऊ, फलटण १५.
औद्योगिक विणकर संस्थेतून सातारा ७९, कऱ्हाड ४८, वाई २४, पाटण ३२, महाबळेश्वर नऊ, जावळी आठ, खटाव २३, माण १६, कोरेगाव १०, खंडाळा १२, फलटण ६०. खरेदी- विक्री संघ : सातारा दोन, महाबळेश्वर शून्य व उर्वरित तालुक्यातून प्रत्येकी एक ठराव. कृषी प्रक्रिया मतदारसंघ : सातारा आठ, कऱ्हाड पाच, वाई दोन, पाटण व महाबळेश्वर प्रत्येकी एक, जावळी तीन, खटाव एक, माण व कोरेगाव शून्य, खंडाळा एक,
फलटण आठ.
ठरावाची प्रक्रिया पूर्ण
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी ठराव करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. जिल्हा बॅंकेकडून कच्ची मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावरच कोणाचे किती ठराव झाले ते समजेल. सध्या उपनिबंधक कार्यालयाने सोसायटींसह इतर पाच मतदारसंघांतून ठरावाची प्रक्रिया पूर्ण केली.
- 1 of 1099
- ››