शेतकऱ्यांचा गळफास सोडवा ः अमर हबीब

शेतकऱ्यांचा गळफास सोडवा ः अमर हबीब
शेतकऱ्यांचा गळफास सोडवा ः अमर हबीब

अकोला ः शेतकरी विरोधी कायद्यामुळे देशातील शेतकऱ्यांची नव्हे तर संपूर्ण देशाची अर्थव्यवस्थाच संपुष्टात आली आहे. शेतकरी विरोधी असलेल्या सीलिंग, अधिग्रहण, आवश्यक वस्तू या कायद्यांमुळे देशाचा शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपुष्टात आला आहे. आज शेतकऱ्यांच्या आत्महत्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही एक राष्ट्रीय आपत्ती आहे. शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, शेतकरी विरोधी कायद्याचे कटकारस्थान सरकार करीत असल्याचा आरोप किसानपुत्र आंदोलनाचे नेते व शेतकरी विरोधी कायद्याचे अभ्यासक अमर हबीब यांनी केला. पातूर तालुक्यातील आलेगांव येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या सभेत ते बोलत होते.

श्री. हबीब पुढे म्हणाले, ‘‘शेतकरी उत्पादक कंपन्याना सीलिंग कायद्यातून वगळण्यात यावे. या देशात सध्या शेतकरी व स्त्रिया यांच्या विरोधात जो कट रचला जात आहे, त्याला हाणून पाडण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटीत होऊन लढा देण्याची गरज आहे.’’  या वेळी कृष्णा अंधारे, मनोज तायडे, जगदीश मुरुमकार, ज्ञानेश्वर गावंडे, दीपक गावंडे, गोपाल महल्ले, रक्षण बापू, सादिकभाई पठाण, बाळूभाऊ सरोदे आदी शेतकरी पदाधिकारी उपस्थित होते. 

वाडेगाव येथेही मार्गदर्शन  श्री. हबीब यांनी शेतकरी जागर मंच व श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वाडेगाव येथील जागेश्वर विद्यालयात आयोजित शिबिरातही मार्गदर्शन केले. शिबिरात गजानन अमदाबादकर यांनी मनोगत मांडले. शिबिराचे प्रास्ताविक कृष्णा अंधारे यांनी केले. शिबिराला जगदीश मुरुमकार, शेतकरी जागर मंचाचे मनोज तायडे, ज्ञानेश्वर गावंडे, शिवाजीराव म्हैसने, ज्ञानेश्वर माळी, दिपक गावंडे, सम्राट डोगरदीवे, नीलेश आवाळे, शेख अन्सारभाई, राजू गवई, पुरुषोत्तम टाले, रक्षण देशमुख, नीलेश देशमुख यांच्यासह जागर मंच, कृषी महाविद्यालय, जागेश्वर विद्यालयाचे मान्यवर उपस्थित होते. राजेश टाले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com