Agriculture news in Marathi Resolve the issue of agricultural college land: Nana Patole | Agrowon

कृषी महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न निकाली काढा ः नाना पटोले

टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावित जागेबाबत वन व  महसूल विभागांनी विचार विमर्श करुन लवकरात लवकर तोडगा काढावा व सात-बारानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केल्या.

भंडारा : कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावित जागेबाबत वन व  महसूल विभागांनी विचार विमर्श करुन लवकरात लवकर तोडगा काढावा व सात-बारानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केल्या. या क्षेत्रातील लोकांच्या विकासासाठी कृषी महाविद्यालय हे महत्त्वाकांक्षी पाऊल ठरणार आहे. त्यानुषंगाने वन विभागाने लवकर जागा उपलबध करुन देण्याचे त्यांनी सांगितले.

कृषी महाविद्यालय जागेबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक विवेक होशिंग व तहसीलदार बाळासाहेब टेळे, साकोली नगर परिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी व पोलीस अधिकारी उपस्थित होते. या बैठकी दरम्यान वन जमीन पट्टे वाटप करण्यात आले. वन जमीन पट्ट्यांच्या संदर्भात ४ हजार ५४४ अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी ३ हजार ७१३ अपात्र ठरुन ८७३ अर्ज पात्र ठरविण्यात आले. त्यापैकी साकोली तालुक्यातील १४ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात वन जमीन पट्टे वाटप करण्यात आले. गरजू लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे प्रदान करताना मनाला दिलासा मिळून आनंद झाल्याची  प्रतिक्रिया  श्री. पटोले यांनी व्यक्त केली.

पुर्नविलोकनातून अपात्र लाभार्थ्यांना पात्र करण्याची कार्यवाही कोरोना संपल्यानंतर करण्यात येणार आहे. ज्यांना अपात्र ठरविले त्यांना वन जमीन पट्टे मिळणार नाही अशी गैरसमजूत करु नये, असा दिलासा त्यांनी लाभार्थ्यांना दिला. याबाबत मार्च मध्ये कागदपत्रांची पूर्तता करण्यात येणार होती, परंतु कोरोना प्रार्दुभावामुळे ते प्रलंबित राहिले. वन जमीन पट्टे धारकास भविष्यात सातबारा देण्यात येणार आहे. त्यामुळे या पट्टयाचे लाभार्थी मालक होतील व सातबारावर त्याचे नाव येईल. तसेच कोणत्याही योजनेचा फायदा घेण्यासाठी पात्र राहून सुविधेचा लाभ घेतील, असेही ते म्हणाले. याबाबत काही अनुचित प्रकार आढळल्यास लाभार्थ्यांनी तहसीलदारांकडे तक्रार करावी. वनहक्क कायदा मध्ये त्यावेळी ज्यांची नोंद रजिस्टरवर आहे अशांचे नाव समितीकडे आहे. त्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच नोंद रजिस्टरची तपासणी ही करण्यात येणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
पुणे विभागात खरीप कांद्याची ४० हजार...पुणे ः खरिपात अति पावसामुळे कांद्याचे नुकसान...
सोलापूर जिल्ह्यात पीक विमा नुकसान...सोलापूर : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
नुकसान भरपाई देण्यास सरकार कटिबद्ध :...औरंगाबाद  : ‘‘आता झालेल्या पावसाने...
कांदा बियाणे मिळवण्यासाठी अकोल्यात...अकोला ः रब्बी कांदा लागवडीची लगबग सुरु झाली...
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा...लातूर ः या वर्षी सुरवतीपासून चांगला पाऊस होत...
जळगाव जिल्ह्यात मक्याची ९० हजार...जळगाव  ः खानदेशात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा...
आजरा तालुक्‍यात भात कापणी सुरूआजरा, जि. कोल्हापूर ः आजरा तालुक्‍यात भात...
कारखानदारांना वाढत्या साखर साठ्याची...मुंबई  : राज्यात गेल्या गाळप हंगामातील ७२...
धानावरील तुडतुड्यांचे वेळीच व्यवस्थापन...नागपूर  : ‘‘सद्यास्थितीत पूर्व विदर्भात...
‘बाभळी’तील पाणी अडविण्यासाठी प्रयत्न...नांदेड : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीकविम्यासाठी कंपनीकडे...नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पुराच्या...
जायकवाडी प्रकल्पातून ५५ टीएमसी पाण्याचा...औरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून गत २५...
सांगली जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन...सांगली ः जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा...
आता खुल्या मिठाईवरही ‘वापर कालावधी’...नागपूर  : मिठाईच्या दुकानातील ‘ट्रे’ वर...
कुलगुरू निवड निकषांबाबत प्र-कुलपतींच्या...पुणे : कुलगुरू निवड निकषांच्या बदलाबाबत कुलपती...
मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांना...मुंबई : विदर्भातील पुरापाठोपाठ मराठवाड्यातील...
कापूस खरेदीचे प्रभावी नियोजन करावे ः...मुंबई : आगामी हंगामामध्ये राज्यात सुमारे ४५० लाख...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कार्यान्वित...मुंबई : लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार...
सीमाभागातील साखर कारखान्यांचे मजूर...कोल्हापूर : जिल्ह्यात ऊस तोडणी मजुरांचे आगमन होत...
जळगावात उडदाला ७५०० रुपये क्विंटल दरजळगाव  ः एकीकडे अतिपावसाने उडदाचे मोठे...