Agriculture news in marathi 'Respect farmers who come for debt relief scheme' | Agrowon

‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्या’

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी  कर्जमुक्ती योजनेच्या  सत्यापनाच्या कामासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक देऊन काम करा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सामान्य सुविधा केंद्र (सीएससी) संचालकांना दिले.

अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी  कर्जमुक्ती योजनेच्या  सत्यापनाच्या कामासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक देऊन काम करा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सामान्य सुविधा केंद्र (सीएससी) संचालकांना दिले.

शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले  शेतकरी  कर्जमाफी  योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या  जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या शुक्रवारी (ता. २१) प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक व आधार क्रमांकांची पडताळणी सामान्य सुविधा केंद्रांमध्ये करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी कॉमन सर्व्हिस सेंटर, आपले सरकार सुविधा केंद्र, महाऑनलाइन संचालकांची बैठक घेतली.

कर्जमुक्ती योजनेच्या आधारकार्डानुसार लाभार्थ्याचे सत्यापन व प्रमाणीकरणाचा कार्यक्रम विशेष मोहिमेंतर्गत २२ ते २८ फेब्रुवारीपर्यंत गावोगावी राबविण्यात येणार आहे याची अंमलबजावणी पडताळणीच्या कामासाठी कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक देण्यात येऊन त्यांना योग्य सहकार्य करण्यात यावे. समाधानकारक काम न केल्यास संबंधित ‘सीएससी’ संचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अकोला तहसीलदार विजय लोखंडे, तालुका कृषी अधिकारी शलाका सरोदे, सीएससी सेंटरचे संजय यादव यांच्यासह इतर उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
नगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची...नगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे...
घनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा...घनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने...
अकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे...अकोला  ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू...
पंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयताकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच...
हिंगोलीत वाहन परवान्यासाठी स्वतंत्र कक्षहिंगोली ः राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये...
नगर : काही ठिकाणी 'खासगी'कडून दूध...नगर  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
सोलापुरात `फोन करा अन किराणा माल,...सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी...
अकोल्यात भाजीपाला विक्रीसाठी...अकोला ः गेल्या काही दिवसांपासून ‘कोरोना’...
विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३...
परभणी शासकीय दुग्धशाळेत दूध संकलनात वाढपरभणी ः ‘कोरोना’ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
जळगावातून उत्तर भारताकरिता केळीची...जळगाव  ः जिल्ह्यातून केळीची उत्तर भारतासह...
कऱ्हाडमध्ये मिळतोय घरपोच भाजीपाला  कऱ्हाड, जि.सातारा  :  कऱ्हाड शहरातील...
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवा...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूंच्या प्रार्दुभावाला...
सोलापूरात ‘कोरोना’बाबत माहितीसाठी...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी...
सोशल मीडियाच्या मदतीने ढोबळी मिरचीची...जळगाव ः कोरोना विषाणूच्या संकटामुळे परराज्यातील...
खुद्द पंतप्रधानांनी साधला नायडू...पुणे : ‘‘तुम्ही स्वतःची नीट काळजी घेत आहात ना,...
निफाडमध्ये पावसाच्या तडाख्यात...नाशिक : चालू वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे...
औरंगाबादेत शेतकरी गटांची फळे, धान्य...औरंगाबाद : जिल्ह्यातील जवळपास चाळीस गावांतील...
अकोला ः केळी उत्पादकांसाठी मार्ग काढा;...अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
तयार बेदाणा बॉक्स नसल्याने ठेवायचा कोठे...सांगली : जिल्ह्यात बेदाणा उत्पादन अंतिम टप्प्यात...