अकोला येथे कुक्कुटपालन प्रशिक्षणास प्रतिसाद

अकोला येथे कुक्कुटपालन प्रशिक्षणास प्रतिसाद
अकोला येथे कुक्कुटपालन प्रशिक्षणास प्रतिसाद

अकोला ः येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेतील कुक्कुटपालन शास्त्र विभागामार्फत ‘व्यावसायिक कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रम’ घेण्यात अाला. यात ६७ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. 

प्रशिक्षणाचे उद्‍घाटन स्टेट बँकेच्या ‘पंदेकृवि’ शाखेचे प्रबंधक कृष्णकुमार डेकाटे यांच्या हस्ते झाले. सदर प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थीना पक्ष्यांच्या जाती, घर बांधणी, खाद्ये व्यवस्थापन, अंडी उबवणी, लसीकरण, आजार व उपचार, रोगनिदान, बाजार व्यवस्थापन, शासनाच्या विविध योजना, कंत्राटी ब्रॉयलर पालन, अंडी उत्पादन व्यवस्थापन, कुक्कुटपालनाचे अर्थशास्त्र इत्यादी बाबींवर प्रात्यक्षिक तसेच सैद्धांतिक मार्गदर्शन करण्यात आले. 

प्रशिक्षणार्थींना सहयोगी अधिष्ठाता डॉ. हेमंत बिराडे यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात अाली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आशिष वानखडे, वरिष्ठ प्राध्यापक डॉ. मिलिंद थोरात व कुक्कुटपालन शास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. सतीश मनवर यांच्या उपस्थितीत देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मयूरा गोळे यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com