मोहोळ येथील कृषी तंत्रज्ञान महोत्सवाला प्रतिसाद

मोहोळ येथील कृषी तंत्रज्ञान महोत्सवाला प्रतिसाद
मोहोळ येथील कृषी तंत्रज्ञान महोत्सवाला प्रतिसाद

सोलापूर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये नुकतेच येथे कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवसांच्या या महोत्सवात विविध विषयांवरील चर्चासत्र तसेच शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या महोत्सवाला मिळाला.

तंत्रज्ञान महोत्सव उद्‍घाटन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिरजदार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी विभागीय कृषी संशोधन केंद्राचे डॉ. डी. व्ही. इंडी होते. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या संचालक डॉ. ज्योत्स्ना शर्मा, कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी कार्यक्रम समन्वयक डॉ. तानाजी वळकुंडे, मोहोळ कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी डॉ. डी. डी. कदम, पाडेगावच्या ऊस संशोधन केंद्राचे डॉ. किरण ओंबासे, विषय विशेषज्ञ दिनेश क्षीरसागर, विषय विशेषज्ञ किरण जाधव उपस्थित होते. 

डॉ. वळकुंडे यांनी यांनी प्रास्ताविकात कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्या आयोजना मागचा उद्देश सांगितला. डॉ. इंडी यांनी ऊस उत्पादनातील महत्त्वाच्या बाबी विषद केल्या. डॉ. ज्योत्स्ना शर्मा यांनी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रामार्फत प्रसारित संशोधनात्मक बाबी, वाण व शिफारशींबाबत माहिती दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बिराजदार यांनी कृषी विभागाच्या विविध योजना, स्वरूप व लाभार्थ्यांची निवड याबाबत माहिती देताना चर्चात्मक स्वरूपात शेतकरी बांधवांच्या शंकांचे निरसन केले. तर तांत्रिक सत्रात डॉ. ओंबासे यांनी ऊस पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. 

त्याशिवाय महिला बचत गटाच्या योजनांबाबत लीड बॅंकेचे व्यवस्थापक आर. डी. चंदनशिवे, योगेश वाघ, पी. के. पलवे, ए. डी. खंबायत यांनी मार्गदर्शन केले. तसेच कृषी पर्यटन, कृषी उद्योग, प्रक्रिया, सेंद्रिय खत निर्मिती अशा विविध विषयांवर धनाजी गावडे, श्रीरंग लाळे, दिनेश क्षीरसागर, काजल जाधव यांचे मार्गदर्शन झाले. तीन दिवसांच्या या महोत्सवात रोज शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शेतकऱ्यांना ज्वारी, हरभरा, करडई, चारा पिके इ. पिकांचे विविध वाण व लागवड तंत्रज्ञान याबाबत शास्त्रज्ञांनी सविस्तर माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com