‘आमच्या गावात, रास्त भावात’ अभियानाला प्रतिसाद

अकोला ः सद्यःस्थितीत ताजा भाजीपाला, फळे अशा नाशवंत शेतमालाचे काय होईल याची चिंता निर्माण झाली असतानाच ग्राहकसुद्धा फळे, भाज्या घेण्यास सुरुवातीला मागेपुढे करीत होते. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला व ग्राहकाला दिलासा मिळावा, या हेतूने शेतकरी संघटनेने जिल्ह्यात ‘आमच्या गावात रास्त भावात’ या अभियानाअंतर्गत शेतमाल ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचून देण्याचे अभियान चालू केले. याचा अकोल्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. कुणाचे कलिंगड, खरबूज, कुणाचा कांदा, तर संत्री, भाजीपाला विक्री होत आहे.
Response to the campaign 'In our village, at a fair price'

लॉकडाऊन दरम्यान शासनाने घालून दिलेले सर्व नियमांचे पालन करीत शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांच्या घरी पोचविला जात आहे. या अभियानाची समाजमाध्यमांत चर्चा सुरू झाली झाल्यानंतर शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना परिसरातील शेतकऱ्यांचे फोन येऊ लागले. व्यवस्थित अंतर राखून फळे, भाजीपाला शहरात थेट ग्राहकांना विकू शकता. यासाठी आवश्यक असेल तेव्हा आम्ही पूर्ण सहकार्य करू, असे शेतकऱ्यांना आश्वस्त करण्यात आले. अकोट तालुक्यातील जितापूर माऊली येथील शेतकरी ज्ञानेश्वर केशव राऊत यांचा उल्लेख करावा लागेल.

त्यांना शेतातील कलिंगड कसे विकायचे हा पेच झाला होता. दोन एकरात त्यांनी लागवड केली होती. शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘आमच्या गावात रास्त भावात’ या घोषवाक्य खाली त्यांची पूर्ण माहिती व मोबाईल क्रमांक टाकून शेतमाल घरपोच मिळणार असल्याची पोस्ट सोशल मीडियात प्रसारित केली. 

त्यानंतर ज्ञानेश्वर राऊत यांना आॅर्डर सुरू झाल्या. दोन दिवसांत त्यांनी तीन गाड्या माल विकला. कलिंगड सोबतच त्यांच्या शेतातील फणस, आंबा व लिंबाची सुद्धा थेट ग्राहकांपर्यंत विक्री होऊन शेतकऱ्याला चांगले पैसे मिळाले. बाळापूर तालुक्यातील टाकळीचे शेतकरी राहुल साबळे यांचा ३०० क्विंटल कांदा थेट ग्राहकांपर्यंत रास्त भावात विकला गेला. 

तेल्हारा तालुक्यातील बेलखेडचे शेतकरी खुमकर यांचेही कलिंगड ग्राहकांना घरपोच विकण्यात आले. वाशीम जिल्ह्यातील शेतकरी अनिल मालपाणी यांनी कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेला संत्रासुद्धा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी इच्छुक ग्राहकांना पोहोचविण्याचे काम सुरू केले. अविनाश नाकट, डॉ. निलेश पाटील, विलास ताथोड, संदीप महल्ले, धनंजय मिश्रा, अजय गावंडे, सचिन गोमासे यांच्यासह इतर पदाधिकारी यासाठी सातत्याने शेतकऱ्यांना सहकार्य करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com