Agriculture news in marathi Response to the Chief Minister's Employment Generation Plan in Solapur district | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेला प्रतिसाद

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

ग्रामीण व शहरी क्षेत्रांतील गरजू लोकांकरिता ही योजना खूप लाभदायक आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने याचा जास्तीत जास्त लाभ घेतला पाहिजे. तरच जिल्ह्याला भरपूर फायदा होईल. 
- बी. टी. यशवंते, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, सोलापूर

सोलापूर : राज्यात शासकीय नोकऱ्यांचे प्रमाण कमी होत चालल्याने पंतप्रधान रोजगारनिर्मितीच्या धर्तीवर मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती सुरू केली आहे. पंतप्रधाननिर्मिती योजनेपेक्षा अनेक फायदे मिळवून देणारी मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजना ऑगस्टपासून सुरू झाली. या योजनेमार्फत दुप्पट कर्ज मिळत असून भरपूर सुविधा उपलब्ध होत आहेत. 

आतापर्यंत जिल्ह्यातील सव्वादोनशे अर्ज आले आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत जास्तीत जास्त ग्रामीण व शहरी लोकांनी याचा लाभ मिळवून घेतला पाहिजे. उत्पादन या अंतर्गत उद्योगांसाठी ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उत्पादन आणि सेवांतर्गत नव्या उद्योगासाठी देता येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग मंत्रालयातर्फे राबविण्यात येणारी ही योजना राज्यात खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि जिल्हा उद्योग केंद्रातर्फे राबविण्यात येत आहे. नव्याने उद्योग सुरू करणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येतो. शहरी बेरोजगारांसाठी जिल्हा उद्योग मंडळ, तर ग्रामीण भागातील बेरोजगारांसाठी खादी ग्रामोद्योग महामंडळामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे.

स्वयंसहायता बचत गट, औद्योगिक संस्था, विश्‍वस्त इ. संस्था वरील दोन्ही योजनांचा लाभ घेऊ शकतात. ग्रामीण व शहरी लोकांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करणे, तरुण वर्गाला व पारंपरिक कारागिरांना एकत्रित करून स्थानिक पातळीवर स्वयंरोजगाराची संधी देणे आदी या उपक्रमाचे उद्देश आहेत. 


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या...
वाकुर्डे योजनेसाठी ७०० कोटींची गरजसांगली : शिराळा व वाळवा तालुक्यासाठी वरदान ठरणारी...
खानदेशात कांदा आवक स्थिर; दरात चढउतारजळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
खरीप पीकविम्यापासून शेतकरी वंचितजळगाव  ः खरिपात पिकांचे अतिपावसाने अतोनात...
‘सन्मान निधी’च्या लाभासाठी ‘आधार लिंक’...अकोला  ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या...
रत्नागिरी जिल्ह्यात नियोजनाचा आराखडा...रत्नागिरी ः जिल्हा नियोजन समितीचा आराखडा २०१...
नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील चार...नांदेड : इसापूर येथील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प,...
काळवंडलेल्या ज्वारीची हमीभावाने खरेदी...अमरावती  ः जिल्ह्यात पावसामुळे काळवंडलेल्या...
नाशिक येथे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष...नाशिक  : नाशिक विभागातील सर्वसामान्य जनेतेचे...
व्हिडिओतील छेडछाड भोवली; प्रभारी सहकार...मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सापडलेले पाच हजार रुपये शेतकऱ्याने केले...सातारा ः सामाजातील प्रामाणिकपणा हरवत चालला...
नगराध्यक्षांची निवड नगरसेवकांमधून...मुंबई : नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या...
सातारा जिल्ह्याच्या विकासात सर्वांनी...सातारा  : चालू आर्थिक वर्षात विविध...
सावकारांकडे गहाण ठेवलेले सोन्याचे...अकोला ः वर्षानुवर्षे सावकारांकडे गहाण पडून असलेले...
कृषिमंत्री पाठविणार चार हजार सरपंचांना...मुंबई : बदलत्या हवामानास तोंड देण्यासाठी गाव अधिक...
अनिल कवडे सहकार; सौरभ राव साखर आयुक्तमुंबई : अरविंद कुमार यांची ग्रामविकास विभागाच्या...
दर्जेदार केळी उत्पादनाचे तंत्रकेळी घडातील फळांच्या आकारात एकसमान बदल होऊन घड...
पुरंदर तालुक्यातून डाळिंबाची युरोपात...गुळुंचे, जि. पुणे : कर्नलवाडी (ता. पुरंदर) येथील...
आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याचा...कोल्हापूर : ‘रयत अ‍ॅग्रो’च्या कडकनाथ कोंबडीपालन...
द्राक्ष सल्ला : तापमानातील चढ-उताराचे...सध्याच्या तापमानाचा विचार करता द्राक्षबागेत...