Agriculture news in Marathi Response to cotton burning movement in Vidarbha | Agrowon

विदर्भात कापूस जाळा आंदोलनाला प्रतिसाद

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

नागपूर ः एफएक्‍यू मधीलच मीडियम आणि शॉर्ट स्टेपल ग्रेड कापसाची खरेदी करावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने विदर्भातील आठ कापूस उत्पादक जिल्ह्यांत कापूस जाळा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला विदर्भासह राज्यात प्रतिसाद मिळाला असून शासनाने वेळीच या आंदोलनाची दखल घेत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

नागपूर ः एफएक्‍यू मधीलच मीडियम आणि शॉर्ट स्टेपल ग्रेड कापसाची खरेदी करावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने विदर्भातील आठ कापूस उत्पादक जिल्ह्यांत कापूस जाळा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला विदर्भासह राज्यात प्रतिसाद मिळाला असून शासनाने वेळीच या आंदोलनाची दखल घेत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

राज्यात ९५ ते १०० लाख क्‍विंटल कापूस शिल्लक असल्याचा दावा करण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे शेतमालाची विक्री शेतकऱ्यांना करता आली नाही. त्यामध्ये कापूस देखील आहे. शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर कापूस शिल्लक असल्याची बाब लक्षात घेत व्यापाऱ्यांकडून कमी दराने त्याला मागणी केली जात असून हा शेतकऱ्यांचा शोषणाचा प्रकार असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.

राज्यात एफएक्‍यू मधील फाईन दर्जाच्या (लॉंग स्टेपल) कापसाची खरेदी सीसीआय आणि पणन महासंघाकडून होत आहे. परंतु ६० ते ७० टक्‍के कापूस मीडियम आणि शॉर्ट स्टेपल आहे. हा कापूस खरेदी करण्याचे सीसीआयच्या नियमावलीत आहे. परंतु हा कापूस राज्यात खरेदी करण्याबाबत यंत्रणा उदासिन असल्याचा आरोप शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेने केला आहे. हा कापूस खरेदी करणे शक्‍य नसल्यास शेतकऱ्यांना भावांतर योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी आहे.

नागपूर जिल्ह्यात झालेल्या या आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण केदार, मुकेश मासूरकर, गुलाबराव धांडे, अरुण भोसले, संजीवन वालदे, सुभाष हिरणवार, गणेश शर्मा, हरदेय पराते, दिलीप गांगुली, आनंद निखार आदी सहभागी झाले होते.

एफएक्‍यू मध्येच तीन ग्रेड आहेत. यातील एकाच ग्रेडमधील कापूस शासनाकडून खरेदी केला जात आहे. हा कापूस उत्पादकांवर अन्याय असल्याने उर्वरित दोन ग्रेडचा निकष लावत कापसाची खरेदी व्हावी, अशी आमची मागणी आहे. त्याकरीता मुठभर कापूस जाळा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला राज्यव्यापी प्रतिसाद मिळाला आहे.
- अनिल घनवट,
राज्य अध्यक्ष, शेतकरी संघटना


इतर ताज्या घडामोडी
अकलूज येथील जनावरांचा बाजार बंदअकलूज, जि. सोलापूर : ‘‘अकलूज कृषी उत्पन्न...
‘अटल भूजल’मध्ये जळगावातील चार तालुके जळगाव : तेरा जिल्ह्यांत एक हजार ३३९...
खासदार गोडसेंकडून कृषी योजनांच्या...नाशिक : शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने...
करमाळ्यातील खडकीत बिबट्यासदृष्य...करमाळा, जि. सोलापूर : खडकी (ता. करमाळा)...
खरेदी केंद्रात व्यापाऱ्यांचा कापूस घेऊ...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यात कापसाचे उत्पादन...
चोपडा तालुक्यात `हतनूर`चे पहिले आवर्तन...गणपूर, जि. जळगाव : हतनूर धरणातून...
नांदेड जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर हरभरा नांदेड : ‘‘यंदाचा समाधानकारक पाऊस आणि...
हिंगोली जिल्ह्यात मर रोगामुळे तूर लागली...हिंगोली : जिल्ह्यातील अनेक भागातील फुलोरा, शेंगा...
पीकविम्यासाठी कृषी विभागाकडे संपर्क करा...नांदेड  : ‘‘ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने...
बटाटा लागवड ठरली फायदेशीरमहाळुंगे पडवळ : आंबेगाव तालुक्‍यातील कळंब, लौकी,...
साताऱ्यात ‘स्वाभिमानी’चे आंदोलनसातारा  : कृषी कायद्याविरोधात पंजाब व...
अकोल्यात रब्बीसाठी २९ कोटींचे कर्जवाटपअकोला : यंदाच्या रब्बी हंगामात लागवड ६५...
रब्बीच्या हंगामात विजेचा अडसररिसोड, जि. वाशीम  : सिंचन सुविधा निर्माण...
विमा कंपन्यांनी सरसकट भरपाई द्यावी - ...यवतमाळ :  जिल्ह्यातील ४ लाख ६७ हजार २१...
जागेअभावी संग्रामपुरात पाच दिवसांपासून...संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाकडे मका...
दोन दिवसांत निर्णय न झाल्यास केंद्र...कोल्हापूर : दोन दिवसांत दिल्लीतील...
गोंदियात ८५ हजार क्विंटल धान खरेदीगोंदिया : जिल्ह्यात हमीभावाने खरेदीसाठी सुरू...
अन्न उद्योग सक्षमीकरणात बारामती ‘...पुणे : सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांचे...
‘ग्रामविकास’कडून वर्षभरात लोकाभिमुख...कोल्हापूर : गेल्या एक वर्षांच्या कालावधीत...
शेतकऱ्यांना अडविणारे राजकारणातून संपणारवर्धा : देशात शेतकऱ्यांना अडविणे आणि शेतकरीविरोधी...