Agriculture news in marathi Response to home-grown vegetables and fruits in Jalna | Agrowon

जालन्यात घरपोच भाजीपाला, फळे विक्रीला प्रतिसाद

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 एप्रिल 2020


शेतकरी ते ग्राहक घरपोच फळे भाजीपाला विक्रीतून दहा टन टरबूज जालना शहरासह इतर गावात जवळपास १५ ते २० रुपये प्रति किलो दराने विकले. 
- मोनिका शर्मा, महिला शेतकरी, मानेगाव, जि. जालना. 
 
शेतातील सर्व भाज्या जाफराबाद शहर आणि परिसरात शेतकरी ते ग्राहक घरपोच विक्री उपक्रमांतर्गत विकल्या. 
- राजेंद्र काळे, शेतकरी वरुड बु. ता. जाफराबाद 

थेट विक्रीमुळे दीड टन शेवगा २५ ते ३० रुपये प्रतिकिलो दराने विकणे शक्य झाले. 
- गजानन देवकर, जांब समर्थ, ता. घनसावंगी. 
..... 
कृषी विज्ञान केंद्राद्वारे सुरू झालेल्या शेतकरी ते ग्राहक घरपोच विक्री उपक्रमामुळे जवळपास दोन टन द्राक्षे घरपोच विकता आली. शिवाय, या उपक्रमातील शेतकऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. 
- लक्ष्मीनारायण खंडेलवाल, जालना. 

जालना : शहरातील नागरिकांना ‘लॉकडाउन’च्या कालावधीत घरपोच भाजीपाला व फळे विक्री करण्याच्या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. कृषी विज्ञान केंद्र खरपुडीतर्फे सुरू झालेल्या या उपक्रमाला कृषी विभाग व ‘आत्मा’चे विशेष सहकार्य मिळते आहे. 

लॉकडाउनच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या फळे भाजीपाला विक्रीचा प्रश्न मार्गी लागावा, सोबतच ग्राहकांनाही वाजवी दरात उत्तम दर्जाचा भाजीपाला व फळे उपलब्ध व्हावी, यासाठी ‘केव्हीके’ने कृषी विज्ञान मंडळातील शेतकऱ्यांच्या समन्वयातून शेतकरी ते ग्राहक घरपोच फळे-भाजीपाला उपक्रम राबविण्याचे ठरविले. यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, कृषी उपसंचालक विजय माईनकर यांच्याशी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व कार्यक्रम समन्वयक एस. व्ही. सोनूने व त्यांच्या सहकाऱ्यांनी संवाद साधला. 

या संवादातून जवळपास ७० शेतकऱ्यांची नावे या उपक्रमासाठी पुढे आली. शेतकऱ्यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकाचा व्हाट्सअप ग्रुप तयार करून त्यामधील समाविष्ट शेतकऱ्यांकडे असलेली फळे व भाजीपाल्याची माहिती संबंधित शेतकऱ्यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकासह जालना शहर व जिल्ह्यातील विविध तालुक्याच्या ठिकाणी नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम कृषी विभाग, आत्मा व कृषी विज्ञान केंद्राच्या समन्वयातून केले गेले.

यामधून शेतकऱ्यांच्या उत्पादित फळे व भाजीपाल्याला अपेक्षित दर मिळणे शक्य झाले. शिवाय ग्राहकांनाही ही ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात मिळाला. या उपक्रमाच्या माध्यमातून सुरू झालेली फळे भाजीपाला विक्रीची उलाढाल आता शेतकरी ते ग्राहक अशी थेट साखळी निर्माण करण्याला मदत करीत असल्याचे चित्र आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...
अकोटमध्ये अतिवृष्टीने कपाशी पाण्याखालीअकोला ः आजवर झालेल्या सततच्या पावसाने अकोट...
बुलडाण्यातील नुकसानीचे पंचनामे करून...बुलडाणा : पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे...
सातगाव पठारावर नुकसानग्रस्त बटाट्याचे...पुणे :‘‘लांबलेला मॉन्सून, सततचा कोसळणारा वादळी...
गाव पातळीवरील बैठका, सभा तात्पुरती...अकोला ः कोवीड १९ च्या वाढत्या प्रभावामुळे गाव...
नोकर भरतीची वयोमर्यादा वाढवाः...चंद्रपूर : कोरोना संकटामुळे या वर्षात नोकरीकरता...
लातूर, उस्मानाबादेत एक लाख ४१ हजार...उस्मानाबाद / लातूर : लातूर व उस्मानाबाद...
औरंगाबाद, जालन्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड...
मजुरांना कष्टाचे तरी पैसे मिळावेत नगर ः राज्यातील साखर कारखान्यांची तब्बल ८० हजार...
पोषक चाऱ्यासाठी ओट लागवडजनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी अधिक पोषणमूल्य...
राज्यात सोयाबीन २५०० ते ३९७४ रुपये नगरमध्ये ३००० ते ३७०० रुपये  नगर येथील...
कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी पीक नियोजनकोरडवाहू  भागातील जमिनीतील ओलावा हा...
हरभऱ्याच्या अधिक उत्पादनासाठी फुले...महात्मा फुले कृषि विदयापिठाने कंबाईन हार्वेस्टरने...
मानवी आहारासाठी पोषणयुक्त जैवसंपृक्त वाणजैवसंपृक्त पिकांची लागवड केल्यास पौष्टिक व...
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...