agriculture news in Marathi response to kisan railway Maharashtra | Agrowon

संत्रा पट्ट्यातून ‘किसान रेल’ सुसाट

विनोद इंगोले
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

संत्रा वाहतुकीकरिता रेल्वेचा स्वस्त आणि वेळेची बचत करणारा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध झाला आहे.

नागपूर : संत्रा वाहतुकीकरिता रेल्वेचा स्वस्त आणि वेळेची बचत करणारा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध झाला आहे. या ‘किसान रेल्वे’ला संत्रा पट्ट्यातून शेतकऱ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून सात फेऱ्यांच्या माध्यमातून आजवर दिल्लीपर्यंत सुमारे पंधराशे टन संत्र्याची वाहतूक करण्यात आली आहे.

विदर्भाचे मुख्य फळपीक म्हणून संत्र्याची ओळख आहे. राज्यात सर्वाधिक म्हणजे ७० हजार हेक्टर क्षेत्र एकट्या अमरावती जिल्ह्यात आहे. त्यानंतर २५ हजार हेक्टर क्षेत्र नागपूर जिल्ह्यात संत्र्याखाली आहे. तर केवळ पाच हजार हेक्‍टर क्षेत्र राज्याच्या इतर भागात विखुरलेले आहे. या भागातून संत्र्याची खरेदी करून पश्चिम बंगाल पर्यंत रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून संत्री पोचविली जातात. तिथून बांगलादेशला संत्र्याची निर्यात केली जाते. 

बांगलादेश नागपुरी संत्र्याचा मोठा आयातदार आहे. बांगलादेश अगोदर दिल्ली तसेच दक्षिणेतील राज्यातून देखील संत्र्याला मागणी राहते. या सर्व राज्यांमध्ये तसेच बांगलादेशपर्यंत संत्रा फळे पोहोचविण्याकरता रस्ते वाहतूक हा एकमेव पर्याय आजवर उपलब्ध होता. हा पर्याय खर्चिक आणि वेळकाढू ठरत होता. आता संत्रा वाहतुकीकरिता किसान रेल्वेच्या माध्यमातून स्वस्त आणि कमी वेळेत संत्रा फळांची वाहतूक करणारा पर्याय उपलब्ध झाला आहे. 

१४ ऑक्टोबरपासून किसान रेल्वेची सुरुवात झाली. दर बुधवारी वरूड ऑरेंज सिटी रेल्वेस्थानकावरून संत्र्याची ‘किसान रेल’ दिल्लीकरीता सोडली जाते. पहिल्यावेळी १२, पार्सल व्हॅन, दुसऱ्या फेरीत १७, तिसऱ्यांदा १२, चौथ्या फेरीत १५, पाचव्या फेरीत १०,  सहाव्या फेरीत १२,  सातव्या फेरीत ११ याप्रमाणे पार्सल व्हॕन बुकिंगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या किसान रेल्वेच्या माध्यमातून ३१७ टन  संत्रा वाहतूक करण्यात आली. त्यानंतर २५०, २००, १७६ अशी सरासरी २०० टन संत्रा वाहतूक होत असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

दिल्लीपर्यंत जाणाऱ्या ‘किसान रेल’ला शेतकऱ्यांचा, व्यापाऱ्यांचा प्रतिसाद मिळत असल्याने कोलकत्तामधील शालिमारपर्यंत देखील संत्रा वाहतुकीकरीता रेल्वेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. शालिमारपर्यंत सोडण्यात आलेल्या पहिल्याच किसान रेल्वेच्या माध्यमातून १६६.६ टन संत्रा वाहतूक करण्यात आली. शालिमारपर्यंत सोडण्यात येणाऱ्या या ‘किसान रेल्वे’ची सुरुवात सांगोला येथून होते.

प्रतिक्रिया
संत्रा वाहतुकीकरिता या भागातील शेतकऱ्यांसाठी किफायतशीर आणि वेळेची बचत करणारा पर्याय उपलब्ध झाला आहे. संत्रा फळ नाशवंत असल्याने कमी वेळेत बाजारपेठेत पोहोचल्यास ग्राहकांपर्यंत लवकर पोहोचेल आणि दर चांगले मिळतील. आत्मनिर्भर मिशन अंतर्गत ‘ऑपरेशन ग्रीन’मधून अन्नप्रक्रिया मंत्रालयाने दहा कोटी रुपये रेल्वेला उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे वाहतूक खर्च ५० टक्केच लागतो. दिल्लीपर्यंत १५१२ रुपये प्रतिटन आकारले जातात. त्यामुळे व्यापारी, शेतकऱ्यांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला. 
- रमेश जिचकार, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनी,  वरुड, अमरावती.

‘किसान रेल’ला मिळत असलेल्या प्रतिसादामागे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक कृष्णांत पाटील यांचे विशेष प्रयत्न आहेत. शेतकऱ्यांना किसान रेल्वेच्या माध्यमातून त्यांना वाटेल तितक्या वजनाचा माल पाठविता येणार आहे. ५० किलोपासून तर टनापर्यंत बुकिंग करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट दिल्लीच्या  बाजारपेठेपर्यंत शेतमाल पाठविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. यापुढील काळात मार्केटिंग चेन शेतकऱ्यांनी तयार केल्यास त्याचे दुरगामी फायदे अनुभवता येतील.
- संजय गंभीर, विपणन अधिकारी, वरूड ऑरेंज सिटी रेल्वेस्थानक

अशा जोडतात पार्सल व्हॕन

वरुड  ४
काटोल    १
नरखेड  १
पांढूर्णा   ३

इतर अॅग्रो विशेष
बीजमाता राहीबाई पोपेरे करणार लोकसभा...अकोले, जि. नगर : पारंपरिक बियाण्यांची जोपासना...
ऊसतोडणीचा प्रश्‍न गंभीर नाशिक : गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील निफाड...
सोयाबीन विक्रमी टप्पा गाठेल कमी उत्पादन, चांगली निर्यात आणि वाढलेला वापर हे...
कृषी पंढरीतील यात्रेची उत्सुकता शिगेला माळेगाव, बारामती ः येथील कृषी पंढरीत आजपासून (ता....
‘पोकरा’ अनुदानातून अनेक घटक वगळले पुणे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (...
कृषी आयुक्‍त थेट बांधावर औरंगाबाद : कृषी विभागाच्या क्षेत्रीय भेट व आढावा...
ठिकठिकाणी ढगाळ वातावरण पुणे ः मागील दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या...
समविचारी शेतकऱ्यांचे राष्ट्रीय संघटन...नागपूर ः शेती प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी...
दुष्काळी स्थितीतही द्राक्षाने दिले...सांगली जिल्ह्यातील वायफळे (ता. तासगाव) येथील...
बारामतीमध्ये उद्यापासून कृषी तंत्रज्ञान...माळेगाव, बारामती ः अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट...
कृषी अधिकारी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात...पुणे ः सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर...
दर वाढूनही नुकसानीमुळे डाळिंब...सांगली ः देशातील मृग हंगामातील डाळिंब उत्पादन...
दुधाचा अभ्यास करा : केंद्र सरकारपुणे : गोवंशापासून मिळणाऱ्या दुधाचे फायदे आणि इतर...
दहा हजार क्विंटल ज्वारीचा झाला भुस्साअकोला  ः  जिल्ह्यात २०१५ ते २०१७...
राज्यात विविध घटनांमध्ये वर्षभरात १७८...नागपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने...
‘सिल्क समग्र’ योजना सुरू ठेवण्यास...औरंगाबाद : तुती टसर रेशीम उद्योग विकासाठी...
ग्राम, शेती विकासाला ‘रोटरी’ची साथनाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ...
फळबागेला प्रक्रिया उत्पादनांची जोडशेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ...
‘अपेडा’वरील नोंदणीत राज्याचा टक्का वाढलानागपूर ः निर्यातीला चालना मिळावी तसेच देशांतर्गत...
चिकन, अंडी खाण्यास पूर्णपणे सुरक्षित ः...पुणे ः पूर्णपणे उकडलेली अंडी आणि चिकन खाण्यासाठी...