जळगाव जिल्ह्यात फक्त मका खरेदीला प्रतिसाद

जिल्ह्यात १७ पैकी १५ भरडधान्य खरेदी केंद्रे सुरू झाले आहेत. भडगाव येथील खरेदी केंद्र सोमवारी (ता. ७) सुरू झाले. परंतु खरेदीला कमी प्रतिसाद आहे. काळी ज्वारी केंद्रातून नाकारली जात आहे. मका खरेदीलाच बऱ्यापैकी प्रतिसाद आहे.
Response to maize purchase only in Jalgaon district
Response to maize purchase only in Jalgaon district

जळगाव ः जिल्ह्यात १७ पैकी १५ भरडधान्य खरेदी केंद्रे सुरू झाले आहेत. भडगाव येथील खरेदी केंद्र सोमवारी (ता. ७) सुरू झाले. परंतु खरेदीला कमी प्रतिसाद आहे. काळी ज्वारी केंद्रातून नाकारली जात आहे. मका खरेदीलाच बऱ्यापैकी प्रतिसाद आहे.

मक्याची गेल्या शुक्रवारपर्यंत सुमारे १६ हजार क्विंटल एवढी खरेदी झाली आहे. खरेदी केंद्रे सर्वत्र एकाच वेळी सुरू झाले नाहीत. मक्याचे दर बाजारात हमीभावापेक्षा कमी आहेत. मक्याचे बऱ्यापैकी उत्पादन आले होते. तसेच दर्जाही चांगला होता. यामुळे मका खरेदीला प्रतिसाद मिळत आहे. मका खरेदीसंबंधी यावल, रावेर, जामनेर येथे चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तर जळगाव येथे मात्र कमी प्रतिसाद मिळाला आहे. जळगाव येथे फक्त २५ शेतकऱ्यांच्या मक्याची खरेदी झाली आहे. सुमारे १०० शेतकऱ्यांनी मका विक्रीसंबंधी जळगावात नोंदणी केली होती.

ज्वारीच्या विक्रीसाठी रावेर, यावल, चोपडा, जळगाव, जामनेर भागात मिळून सुमारे ११०० शेतकऱ्यांची नोंदणी झाली होती. परंतु ज्वारीची कुठलीही खरेदी झालेली नाही. कारण ज्वारीचा दर्जा अतिपावसात घसरला होता. ज्वारीची आवक केंद्रात झाली, परंतु ती विक्रीयोग्य (एफएक्यू) नसल्याने तिची खरेदी केंद्रात नाकारण्यात आली. बाजरीची खरेदीदेखील फारशी नाही. बाजरी विक्रीसाठी जामनेर, पाचोरा वगळता इतर भागात फारशी नोंदणी शेतकऱ्यांनी केलेली नव्हती.

बारदान्याचा अभाव धान्य खरेदीसंबंधी बारदान्याचा पुरवठा शासनाकडून कुठेही झालेला नाही. चोपडा, रावेर, यावल आदी भागांत बादरानासंबंधी शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. दुसरीकडे शासनाने शेतकऱ्यांनी बारदाना आणावा, असे आवाहन केले आहे. पण बारदाना बाजारातून खरेदी करणे शक्य नाही. शासनानेच त्याचा पुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा केली आहे. बारदान्याच्या समस्येमुळे यावल, रावेर, चोपडा येथे काही शेतकऱ्यांनी मका विक्रीसंबंधी खरेदी केंद्रातून मेसेज येऊनही मक्याची विक्री टाळली, अशी माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com