Agriculture news in Marathi Response to maize purchase only in Jalgaon district | Page 2 ||| Agrowon

जळगाव जिल्ह्यात फक्त मका खरेदीला प्रतिसाद

टीम अॅग्रोवन
बुधवार, 9 डिसेंबर 2020

जिल्ह्यात १७ पैकी १५ भरडधान्य खरेदी केंद्रे सुरू झाले आहेत. भडगाव येथील खरेदी केंद्र सोमवारी (ता. ७) सुरू झाले. परंतु खरेदीला कमी प्रतिसाद आहे. काळी ज्वारी केंद्रातून नाकारली जात आहे. मका खरेदीलाच बऱ्यापैकी प्रतिसाद आहे.

जळगाव ः जिल्ह्यात १७ पैकी १५ भरडधान्य खरेदी केंद्रे सुरू झाले आहेत. भडगाव येथील खरेदी केंद्र सोमवारी (ता. ७) सुरू झाले. परंतु खरेदीला कमी प्रतिसाद आहे. काळी ज्वारी केंद्रातून नाकारली जात आहे. मका खरेदीलाच बऱ्यापैकी प्रतिसाद आहे.

मक्याची गेल्या शुक्रवारपर्यंत सुमारे १६ हजार क्विंटल एवढी खरेदी झाली आहे. खरेदी केंद्रे सर्वत्र एकाच वेळी सुरू झाले नाहीत. मक्याचे दर बाजारात हमीभावापेक्षा कमी आहेत. मक्याचे बऱ्यापैकी उत्पादन आले होते. तसेच दर्जाही चांगला होता. यामुळे मका खरेदीला प्रतिसाद मिळत आहे. मका खरेदीसंबंधी यावल, रावेर, जामनेर येथे चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तर जळगाव येथे मात्र कमी प्रतिसाद मिळाला आहे. जळगाव येथे फक्त २५ शेतकऱ्यांच्या मक्याची खरेदी झाली आहे. सुमारे १०० शेतकऱ्यांनी मका विक्रीसंबंधी जळगावात नोंदणी केली होती.

ज्वारीच्या विक्रीसाठी रावेर, यावल, चोपडा, जळगाव, जामनेर भागात मिळून सुमारे ११०० शेतकऱ्यांची नोंदणी झाली होती. परंतु ज्वारीची कुठलीही खरेदी झालेली नाही. कारण ज्वारीचा दर्जा अतिपावसात घसरला होता. ज्वारीची आवक केंद्रात झाली, परंतु ती विक्रीयोग्य (एफएक्यू) नसल्याने तिची खरेदी केंद्रात नाकारण्यात आली. बाजरीची खरेदीदेखील फारशी नाही. बाजरी विक्रीसाठी जामनेर, पाचोरा वगळता इतर भागात फारशी नोंदणी शेतकऱ्यांनी केलेली नव्हती.

बारदान्याचा अभाव
धान्य खरेदीसंबंधी बारदान्याचा पुरवठा शासनाकडून कुठेही झालेला नाही. चोपडा, रावेर, यावल आदी भागांत बादरानासंबंधी शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. दुसरीकडे शासनाने शेतकऱ्यांनी बारदाना आणावा, असे आवाहन केले आहे. पण बारदाना बाजारातून खरेदी करणे शक्य नाही. शासनानेच त्याचा पुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा केली आहे. बारदान्याच्या समस्येमुळे यावल, रावेर, चोपडा येथे काही शेतकऱ्यांनी मका विक्रीसंबंधी खरेदी केंद्रातून मेसेज येऊनही मक्याची विक्री टाळली, अशी माहिती मिळाली.


इतर ताज्या घडामोडी
मॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...
शेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...
पुण्यात बहुतांश भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
कृषी सल्ला ( राहुरी विभाग)हवामान सारांश ः पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ...
अलमट्टीवर आधुनिक रियल टाइम डाटा यंत्रणा...कोल्हापूर : पूरपरस्थितीचा सामना करण्यासाठी...
अकलूज नगरपालिकेच्या मागणीसाठी माळशिरसला...सोलापूर : अकलूज येथे नगरपालिका व नातेपुते येथे...
ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून तिवसा शहराला...अमरावती : ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून तिवसा शहरासाठी...
नांदेडमध्ये पीककर्ज वाटप संथ; ... नांदेड : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ११६८ कोटी...
टोमॅटोचे दर उतरले; शेतकरी संतप्तनारायणगाव, जि. पुणे :  जुन्नर कृषी उत्पन्न...
आठवड्यात मध्यम ते हलक्‍या पावसाची शक्‍...या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी आणि पावसातील...
‘एक गाव, एक वाण’साठी कारंजातील नऊ...वाशीम : राज्य शासनाच्या बाळासाहेब ठाकरे कृषी...
‘ताकारी’च्या लाभक्षेत्राची ड्रोनद्वारे...सांगली : ताकारी उपसा सिंचन योजनेच्या क्षेत्रातील...
खानदेशात पेरण्या रखडत; कमी पावसामुळे...जळगाव : खानदेशात खरिपातील पिकांच्या पेरणीला रखडत...
निम्न दुधना प्रकल्पात वाढली पाण्याची आवकपरतूर, जि. जालना : यंदा पावसाळा सुरू होताच पाऊस...
ब्रह्मगिरी पर्वतावर अवैध उत्खनन;...नाशिक : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या...
अमरावती विभागात कर्जवाटपात...यवतमाळ : पीककर्ज वाटपासाठी शासनाने बँकांना...
आदिवासींच्या जमिनींचा शोध घेण्यासाठी ‘...बुलडाणा : संग्रामपूर तालुक्यातील चिचारी येथील...
यवतमाळमध्ये ६५ लाखांचे बोगस बीटी...यवतमाळ : जिल्ह्यात खरिपाची लगबग सुरू आहे. याचा...
काळ्याफिती लावून किसानपुत्रांचे आंदोलनआंबेजोगाई, जि. बीड : किसानपुत्र आंदोलनाच्या...
हमीभावाने एक हजार क्विंटल मका खरेदीऔरंगाबाद : आधारभूत किमतीने शेतीमाल खरेदी...