माथाडी `बंद`ला मुंबईत प्रतिसाद

माथाडी कामगांराच्या विविध मागण्यांसाठी राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने पुकारलेल्या बाजार समिती बंदला मुंबईl (वाशी) चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यातील इतर ठिकाणी मात्र संमिश्र प्रतिसाद मिळाला.
 माथाडी `बंद`ला मुंबईत प्रतिसाद Response to Mathadi `Bandh` in Mumbai
माथाडी `बंद`ला मुंबईत प्रतिसाद Response to Mathadi `Bandh` in Mumbai

पुणे : माथाडी कामगांराच्या विविध मागण्यांसाठी राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने पुकारलेल्या बाजार समिती बंदला मुंबईl (वाशी)  चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यातील इतर ठिकाणी मात्र संमिश्र प्रतिसाद मिळाला. युनियनचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील यांनी बंदची हाक दिली होती.

कोरोना संकटात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या माथाडी कामगारांचे हाल झाले. अनेकांचा रोजगार गेल्याने उपासमारीची वेळ आली आहे. नवीन कायद्यांमुळे देखील कामगारांवर बेरोजगारीचे संकट आले आहे. कामगारांसाठीच्या विविध १८ मागण्यांसाठी बंद ठेवण्यात आला होता. 

वाशी बाजार समितीमध्ये झालेल्या सभेत बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले, ‘‘आपल्या संपाची दखल घेऊन २४ डिसेंबरला सरकारने बैठक आयोजित केली आहे. या बैठकित प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक न केल्यास नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच माथाडी कामगारांना न्याय हक्कासाठी तीव्र आंदोलन केला जाईल.

आजचा संप सरकारला इशार देण्यासाठी होता. सरकारने आपल्या आंदोलनाची दखल घेतल्याने आंदोलन मागे घेत आहे.’’ पुणे बाजार समितीमध्ये बंदचा कोणताही परिणाम व्यवहारावर झाला नाही. सर्व व्यवहार सुरळीत होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com