Agriculture news in marathi, Response to MGNREGA due to good rains | Agrowon

चांगल्या पावसामुळे ‘मनरेगा’ला प्रतिसाद

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 सप्टेंबर 2021

जळगाव : कोरोनाकाळात ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचे काम मिळवून देणारी योजना म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ठरली होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला खरा, मात्र आजही या योजनेत सहा हजार ९२० बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

जळगाव : कोरोनाकाळात ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचे काम मिळवून देणारी योजना म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ठरली होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला खरा, मात्र आजही या योजनेत सहा हजार ९२० बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. पाऊस चांगला होत असल्याने वृक्षलागवड, फळबाग लागवड अशा कामांवर अधिक मजूर काम करताना दिसत आहेत. 

लॉकडाउनच्या काळात या योजनेंतर्गत सुमारे नऊ हजार १३७ मजुरांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला होता. आता मजूरसंख्येत दोन हजारांनी घट झाली आहे. २०२०-२१ या वर्षात या योजनेंतर्गत ४६९ कोटी ६१ लाख एवढा निधी मजुरीवर खर्च झाला आहे. या योजनेंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक कामे करण्यात आली आहेत. त्यात फळबाग लागवड, वृक्षलागवड, शोषखड्डे, घरकुल सिंचन विहीर, रस्ते, नाला खोलीकरण, संरक्षक भिंत अशी कामे करण्यात आली आहेत. 

पावसाळ्यात सध्या मजूरसंख्या कमी आहे. तरीही सहा हजार ९२० जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. यंदा मजुरी २३८ वरून २४८ एवढी झाली. त्यामुळे मजुरांमध्ये आनंद आहे. वृक्षलागवड, वैयक्तिक शौचालय, फळबाग लागवड, विहीर खोलीकरण, जिल्हा परिषदेच्या शाळांना कंपाउंड अशी कामे सुरू आहेत. 
- प्रसाद मते, उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना, जळगाव.

‘रोहयो’चे आकडे 

सध्या सुरू कामे १,२०९
ग्रामपंचायतीची संख्या ५०६
मजुरांची संख्या   ६ हजार ९२०
आजअखेर मनुष्यनिर्मिती दिवस १,६३,५५३

 


इतर बातम्या
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची  ५६...कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात  पावसाची उघडीप पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक...
यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यताकोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात...
शेतीला सोलर कुंपण घाला यवतमाळ : वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे...
सततच्या पावसामुळे  रिसोडमध्ये सोयाबीन...रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
  सांगली जिल्हा बँकेच्या  चौकशीला...सागंली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार कायदा...
खरीप हंगाम काढणीवर  पावसाचे गडद सावट नांदुरा, जि. वाशीम : खरीप हंगामातील पिके...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
खानदेशात प्रशासनाकडून रब्बीतील पीककर्ज...जळगाव  : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरणाची...
मराठवाड्यात पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २३)...
जळगाव जिल्ह्यास पावसाने झोडपलेजळगाव  : जिल्ह्यात गुरुवारी (ता.२३) अनेक...
तडवळेत जोरदार पावसामुळे सोयाबीन...कसबे तडवळे, जि. उस्मानाबाद : परिसरात गेल्या चार...
परभणी, हिंगोलीत पावसाने सोयाबीनला फुटले...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु...