मंगळवेढ्यात डाळिंबाच्या सौद्यांना प्रतिसाद

डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव सुरू केलेल्या सौद्यात पहिल्याच महिन्यात प्रतिसाद मिळाला. त्यामुळे भविष्यात बाजार समितीच्या माध्यमातून डाळिंब उत्पादकांसाठी प्रशिक्षण शिबिर घेऊन तज्ज्ञांच्या माध्यमातून चांगले उत्पादन होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. - सोमनाथ आवताडे, सभापती, मंगळवेढा बाजार समिती. सोलापूर, पंढरपूरकडे डाळिंब घेऊन जाण्याचा आमचा वाहतूक खर्च वाचला. आमच्याच भागात डाळिंबाला मार्केट मिळत असल्याने सोय झाली. आता फक्त सोई-सुविधा द्याव्यात, ही अपेक्षा आहे. - साऊबा वाले, शेतकरी, खुपसंगी
Response to pomegranate deals in Mangalvedha
Response to pomegranate deals in Mangalvedha

मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीने नव्याने सुरू केलेल्या डाळिंब सौदे व्यवहारात अवघ्या पंधरवड्यातच जवळपास १ कोटी ७६ लाख ४६ हजार ६२९ रुपयांची उलाढाल झाली. बाजार समितीने डाळिंब उत्पादकांसाठी सुरू केलेल्या सौदे व्यवहारास डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे, हेच यावरून दिसून येते. 

मंगळवेढा तालक्‍यात ऊस, ज्वारीबरोबर डाळिंबाचे क्षेत्रही वाढते आहे. जवळपास दहा हजार हेक्‍टरहून अधिक क्षेत्र डाळिंबाचे आहे. तालुक्‍यातील सलगर बु, सलगर खु, लवंगी, मारोळी, महमदाबाद (शे), गणेशवाडी, आंधळगाव, खुपसंगी, नंदुर, डोणज, अरळी, नंदेश्वर, भोसे या भागात डाळिंबाचे क्षेत्र आहे. यापूर्वी डाळिंबांच्या सौद्यासाठी शेतकऱ्यांना सोलापूर आणि पंढरपूरचा पर्याय होता. त्यामुळे वाहतूक खर्चही वाढत होता; पण आता मंगळवेढ्यातच सोय झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

आठवड्यातील तीन दिवस हे सौदे सुरू असतात. प्रामुख्याने सोमवार, बुधवार, शुक्रवार असे तीन दिवस दुपारी चार वाजता डाळिंब सौदे सुरू राहतात. गेल्या पंधरवड्यात जवळपास १९८३ शेतकऱ्यांनी ४२ हजार ४८२ क्रेटच्या माध्यमातून ६८१ टन डाळिंब विक्रीसाठी बाजार समितीमध्ये आणले होते. यामध्ये दाखल झालेल्या डाळिंबास १६० रुपये प्रतिकिलोचा उच्चांकी दर मिळाला. त्यातून जवळपास १ कोटी ७६ लाख ४६ हजार ६२९ रुपयांची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com