रत्नागिरी जिल्ह्यात सौरपंप योजनेला प्रतिसाद

जिल्ह्यातील पडीक आणि कातळ जमिनीला संजीवनी देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौरपंप योजनेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सुमारे ८०० शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला आहे. त्यापैकी ४८८ शेतकऱ्यांनी सौरपंप योजनेचा लाभ घेतला आहे.
Response to solar pump scheme in Ratnagiri district
Response to solar pump scheme in Ratnagiri district

रत्नागिरी ः जिल्ह्यातील पडीक आणि कातळ जमिनीला संजीवनी देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौरपंप योजनेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सुमारे ८०० शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला आहे. त्यापैकी ४८८ शेतकऱ्यांनी सौरपंप योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कातळ जमिनीवर करण्यात येणाऱ्या लागवडीला ही योजना वरदान ठरली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

शेतकऱ्याला नियमित वीजपुरवठा व्हावा, यादृष्टीने शासन स्तरावर नेहमी प्रयत्न होत असतात. यासाठी कोकणात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे शेतीला दिवसभर वीजपुरवठा राहणार आहे. तसेच वीज खंडीत अथवा भारनियमनातही शेतीला पाण्याचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे जेथे पाण्याची वानवा आहे, अशा लागवडीला ही योजना प्रभावी ठरली आहे.

योजनेची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी कृषी विभागातर्फे मोठ्या प्रमाणात जागृती करण्यात येत आहे. शेतकऱ्यांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्याचा अधिक भाग कातळ जमिनीचा आहे. या जमिनीत लागवड करणे हे या योजनेमुळे शक्य झाले आहे. काही शेतकऱ्यांनी योजनेचा फायदाही घेतला आहे. यासाठी जिल्ह्यात दोन हजार शेतकऱ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, अशा शेतकऱ्यांना ऑनलाइन प्रस्तावाद्वारे योजनेत सहभागी होता येणार आहे.

या योजनेत शेतकऱ्यांना तीन आणि पाच अश्‍वशक्तीचे सौर कृषी पंप वितरित करण्यात येत आहेत. यासाठी खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना तीन अश्‍वशक्तीसाठी २५,५०० रुपये तर पाच अश्‍वशक्तीसाठी ३८,५०० रुपये एवढी रक्कम भरायची आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या लाभार्थ्याला अर्धी म्हणजे १२,७५० रुपये आणि १९,२५० रुपये भरावे लागणार आहेत. ज्या शेतकऱ्यांना वीजजोडणी मिळण्यात अडचणी आहेत. अशा भागात वीजजोडणीची मागणी करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना प्राधान्याने सौर कृषी पंप देण्यात येणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com