खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसाद

खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसाद
खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसाद

जळगाव  ः जिल्ह्यात तूर नोंदणीसंबंधी १० केंद्रे सुरू करण्याचे निश्‍चित झाले आहे. यात नोंदणीसाठी अमळनेर, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड या भागांत प्रतिसाद मिळत आहे. परंतु जळगावच्या केंद्रात कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही.  जिल्ह्यात रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, जळगाव, अमळनेर, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा येथे तूर खरेदी सुरू करण्याचे नियोजन आहे. यातील जळगाव व अमळनेर येथील नियोजित केंद्रात तूर खरेदीसंबंधी कार्यवाही हाती घेण्यात आली. परंतु इतर भागांत नोंदणीसंबंधीचे आयडी उपलब्ध नसल्याने ऑनलाइन नोंदणी शेतकरी तूर विक्रीसाठी करू शकत नव्हते. परंतु, ही तांत्रिक अडचण मध्यंतरी दूर झाली असून, तूर विक्रीसंबंधी शेतकरी इतर केंद्रातही नोंदणी करू शकत आहेत. नोंदणीसंबंधी जळगावच्या केंद्रात कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही.  जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर व रावेर येथे बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला आहे. १४ फेब्रुवारीपर्यंत तूर विक्रीसंबंधी शेतकरी या नियोजीत केंद्रात ऑनलाइन नोंदणी करू शकतील. शुक्रवारपर्यंत (ता. २४) सुमारे ५०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. जळगावसह पाचोरा, भडगाव, चाळीसगाव येथील केंद्रांमध्येही नोंदणीबाबत कमी प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले.  बाजारात दर ४५०० च्या वर शासकीय तूर खरेदी ५८०० रुपये प्रतिक्विंटल या दरात केली जाणार आहे. बाजारात मात्र दर हमीभावापेक्षा कमी असून, दर ४५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. दर स्थिर असले तरी ते कमी असल्याने शासकीय खरेदी लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. सध्या अमळनेर, जळगाव, मुक्ताईनगर येथील बाजारात तुरीची आवक सुरू आहे. आवक अधिक नसली तरी पुढील आठवड्यात आवक वाढू शकते, असे सांगण्यात आले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com