Agriculture news in marathi Response to tur purchases in four centers in Jalgaon | Agrowon

तूर खरेदीला जळगाव जिल्ह्यात चार केंद्रांमध्ये प्रतिसाद

टीम अॅग्रोवन
शनिवार, 7 मार्च 2020

जळगाव ः जिल्ह्यात रावेर, मुक्ताईनगर, बोदवड व अमळनेर येथे शासकीय तूर खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असून, प्रतिदिन १०० क्विंटलपर्यंतची खरेदी या केंद्रांमध्ये होत आहे. 

जळगाव ः जिल्ह्यात रावेर, मुक्ताईनगर, बोदवड व अमळनेर येथे शासकीय तूर खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असून, प्रतिदिन १०० क्विंटलपर्यंतची खरेदी या केंद्रांमध्ये होत आहे. 

जिल्ह्यात काही खरेदी केंद्र मागील सोमवारी (ता. २) तर काही केंद्र मागील दोन दिवसांत सुरू झाले आहेत. १० केंद्र आहेत. त्यात चाळीसगाव, भडगाव, चोपडा, जळगाव, जामनेर व  पाचोरा या केंद्रांचाही समावेश आहेत. परंतु जळगाव, भडगाव, चोपडा येथील केंद्रात तूर खरेदीला प्रतिसाद मिळालेला नाही. तूर विक्रीसंबंधी शेतकरी ऑनलाइन नोंदणी संबंधित केंद्रात येत्या १५ मार्चपर्यंत करू शकणार आहेत. सुमारे तीन हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी तूर विक्रीसंबंधीची ऑनलाइन नोंदणी करून घेतली आहे. तुरीचे दर बाजारात कमाल पाच हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. तर शासकीय केंद्रात ५८०० रुपये प्रतिक्विंटल, या दरात तुरीची खरेदी सुरू आहे. शासकीय तूर खरेदी सुरू झाल्याने बाजारात तूर दरांमध्ये सुधारणा झाली आहे. 

यातच जिल्ह्यात १२ केंद्रांमध्ये हरभरा खरेदीचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यात जेथे तूर खरेदी सुरू आहे, ती १० केंद्र व यावल आणि पारोळा येथे हरभरा खरेदी सुरू करण्याची तयारी सुरू असून, यासंदर्भात शेतकऱ्यांच्या हरभरा विक्रीबाबतची ऑनलाइन नोंदणी सुरू करण्याचे आदेश केंद्रधारकांना मार्केटिंग फेडरेशनने दिले आहेत. परंतु केंद्रधारकांनी ज्वारी, मका आदी खरेदी करताना आलेला वाहतूक खर्च, कमिशन मार्केटिंग फेडरेशनने अदा करावे. 

हे चुकारे मिळत नाहीत, तोपर्यंत ऑनलाइन नोंदणी करणार नाही, अशी भूमिका केंद्रधारकांनी घेतली आहे. यामुळे ऑनलाइन नोंदणी बंदावस्थेतच आहे. यातच येत्या सोमवारपासून (ता. ९) कुठल्याही स्थितीत ऑनलाइन नोंदणी सुरू केली पाहिजे, असे पुन्हा फेडरेशनने केंद्रधारकांना पत्र देऊन बजावले आहे. परंतु, केंद्रधारकांनी या पत्रालाही प्रतिसाद दिलेला नसल्याचे चित्र आहे.


इतर ताज्या घडामोडी
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...
अकोला जिल्हा परिषदेचा ७६ कोटींचा निधी...अकोला  ः ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या...
हिंगोली जिल्ह्यात ५९ कोटींचे पीककर्ज...हिंगोली   ः हिंगोली जिल्ह्यातील विविध...
कापूस, सोयाबीन उत्पादक विमा...गडचिरोली: धान उत्पादक ३४ हजार शेतकऱ्यांना सुमारे...
नांदेडमध्ये ४७ कोटी ४७ लाखांचे पीक कर्ज...नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बॅंकांनी...
जालन्यात पाच हजार टन खते एकाच दिवशी...जालना  : जिल्ह्यात एकाच दिवशी पाच हजार...
कर्जमुक्‍ती योजनेची प्रक्रिया ३०...भंडारा ः शासनाने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव...
जयपूरमध्ये वीज पडून लाखो रुपयांच्या...नाशिक : पूर्वमोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर बागलाण...
बुलडाणा जिल्ह्यात १५ तारखेपर्यंत...बुलडाणा  : यंदा जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पाऊस...
भाजीपाल्याची थेट खरेदी विक्री व्यवस्था...पुणे ः कोरोना टाळेबंदीमध्ये शहरातील विविध भागात...
सातारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीसातारा ः जिल्ह्यात सोमवारी सर्वदूर पावसाने हजेरी...
कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांचा रास्तारोकोयवतमाळ ः महागाव तालुक्‍यातील गुंज येथील...
पुणे जिल्ह्यात पीककर्ज वितरणात...पुणे ः लाॅकडाऊनच्या काळात होरपळून निघालेल्या...