‘पंतप्रधान शेतकरी सन्मान’ची जबाबदारी कृषी विभागाचीच

न्यायडोंगरी, ता. नांदगाव : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या पोर्टलवर नाव आहे; पण मदत मिळत नाही. ज्या शेतकऱ्यांना काही हप्ते मिळालेत. त्यांचे तांत्रिक कारणाने पुढील हप्ते येणे बंद झालेत. या संदर्भात कृषी विभाग पडताळणी करेल, असे स्पष्ट निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले.
The responsibility of ‘Prime Minister Farmer Honor’ lies with the Department of Agriculture

मंत्री भुसे नांदगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आले होते. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. राज्यातील पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना ही राज्य शासनाच्या महसूल व कृषी विभागाच्या श्रेयवादात सापडली होती. पोर्टलवर नाव आहे; परंतु आर्थिकसहाय्य मिळत नाही, आधारकार्ड अपडेट नसणे, आधारकार्डमधील नाव व बँक पासबुकमधील नाव यात फरक असणे, याबाबत दुरुस्ती करावी लागते. आधारकार्ड लिंक नसेल तर ते लिंक केल्यानंतर त्याची पडताळणी संबंधित विभागाकडे करावी लागते. कृषी विभाग या दोन्ही विभागांच्या वादात शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या. त्यात तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी शेतकरी हे दोन्ही विभागांकडे चकरा मारत असताना यातून मार्ग निघत नव्हता.

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसंदर्भात आम्ही राज्याच्या मुख्य सचिवांची भेट मागितली आहे. या योजनेसंदर्भात आमच्या पातळीवरील शंभर टक्के काम पूर्ण झालेले असल्याने येथून पुढे ही योजना तांत्रिक अडचणीसंदर्भातील कामे कृषी विभागाने करावी, अशी मागणी आम्ही केली आहे. - ज्ञानदेव डुबल, अध्यक्ष,  महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com