Agriculture news in Marathi The responsibility of ‘Prime Minister Farmer Honor’ lies with the Department of Agriculture | Page 3 ||| Agrowon

‘पंतप्रधान शेतकरी सन्मान’ची जबाबदारी कृषी विभागाचीच

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 सप्टेंबर 2021

न्यायडोंगरी, ता. नांदगाव : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या पोर्टलवर नाव आहे; पण मदत मिळत नाही. ज्या शेतकऱ्यांना काही हप्ते मिळालेत. त्यांचे तांत्रिक कारणाने पुढील हप्ते येणे बंद झालेत. या संदर्भात कृषी विभाग पडताळणी करेल, असे स्पष्ट निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले. 

न्यायडोंगरी, ता. नांदगाव : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या पोर्टलवर नाव आहे; पण मदत मिळत नाही. ज्या शेतकऱ्यांना काही हप्ते मिळालेत. त्यांचे तांत्रिक कारणाने पुढील हप्ते येणे बंद झालेत. या संदर्भात कृषी विभाग पडताळणी करेल, असे स्पष्ट निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले. 

मंत्री भुसे नांदगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आले होते. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. राज्यातील पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना ही राज्य शासनाच्या महसूल व कृषी विभागाच्या श्रेयवादात सापडली होती. पोर्टलवर नाव आहे; परंतु आर्थिकसहाय्य मिळत नाही, आधारकार्ड अपडेट नसणे, आधारकार्डमधील नाव व बँक पासबुकमधील नाव यात फरक असणे, याबाबत दुरुस्ती करावी लागते. आधारकार्ड लिंक नसेल तर ते लिंक केल्यानंतर त्याची पडताळणी संबंधित विभागाकडे करावी लागते. कृषी विभाग या दोन्ही विभागांच्या वादात शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या. त्यात तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी शेतकरी हे दोन्ही विभागांकडे चकरा मारत असताना यातून मार्ग निघत नव्हता.

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसंदर्भात आम्ही राज्याच्या मुख्य सचिवांची भेट मागितली आहे. या योजनेसंदर्भात आमच्या पातळीवरील शंभर टक्के काम पूर्ण झालेले असल्याने येथून पुढे ही योजना तांत्रिक अडचणीसंदर्भातील कामे कृषी विभागाने करावी, अशी मागणी आम्ही केली आहे.
- ज्ञानदेव डुबल, अध्यक्ष, 
महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळ


इतर अॅग्रो विशेष
शेतीसाठी दिवसा बारा तास विद्युतपुरवठा...नागूपर : शेतकऱ्यांचे धानाचे पीक गर्भात आहे, ते...
द्राक्ष विमा परताव्यासाठी चकरा...नाशिक : मार्च २०२१ अखेरीस संपलेला द्राक्ष...
मॉन्सूनोत्तर पावसाचा पिकांना दणकापुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
देशातील सोयाबीनची केवळ २७ टक्के काढणीपुणे : खरीप हंगाम २०२१-२२मध्ये सोयाबीनची लागवड...
संघर्षातून फुलले शेतीमध्ये 'नवजीवन'अवघी दोन एकर जिरायती शेती. खाण्यापुरती बाजरी...
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
विदर्भ, मराठवाड्यात उद्यापासून पावसाची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) संपूर्ण...
सूक्ष्म सिंचन अनुदानात वाढपुणे ः केंद्र सरकारने पंतप्रधान कृषी सिंचन...
मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघारपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
भाजपच्या जातीयवादाला धर्मनिरपेक्षवादाने...मुंबई ः या देशात भाजप जो टोकाचा जातीयवाद करतो आहे...
‘कथनी आणि करणी’त फरक पुन्हा उघडपुणे : आधीच अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेल्या...
बाजाराचा अंदाज घेऊनच सोयाबीन विक्री करापुणे : सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात कपात...
लातुरात सोयाबीनच्या भावात तीनशेची घसरणलातूर ः खाद्यतेल आयात शुल्क कपातीच्या निर्णयानंतर...
आमदारांच्या स्थानिक विकास निधीत एक...मुंबई : आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन...
झेंडूसह अन्य फुलांमध्ये शिरसोलीची ओळखजळगाव जिल्ह्यातील शिरसोली गाव फुलशेतीसाठी...
मॉन्सूनचा महाराष्ट्रातून निरोपपुणे : राजस्थानातून परतीच्या प्रवासाला उशिरा...
देशी केळी अन रताळ्यांना नवरात्रीसाठी...कोल्हापूर जिल्ह्यात नवरात्रीच्या निमित्ताने...
रब्बीसाठी बियाणे पुरवठादार म्हणून...अकोला ः येत्या रब्बी हंगामात राष्ट्रीय अन्न...
खाद्यतेल आयातशुल्कात मोठी कपातपुणे : काही केल्या खाद्यतेलाचे दर कमी होत नाही...
अतिवृष्टिग्रस्तांसाठी १० हजार कोटीमुंबई ः राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे...