Agriculture news in marathi Restrictions on agriculture | Agrowon

‘शेती’वरही निर्बंध; दुकाने फक्त 'या' वेळेत सुरू...

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 एप्रिल 2021

कोरोना विषाणूच्या जीवघेण्या साथीला पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी (ता. २०) कठोर नियमावली जाहीर केली. त्यानुसार आता कृषी संबंधित व्यवहारदेखील लॉकडाउनच्या कक्षेत आणले गेले आहेत

पुणे : कोरोना विषाणूच्या जीवघेण्या साथीला पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी (ता. २०) कठोर नियमावली जाहीर केली. त्यानुसार आता कृषी संबंधित व्यवहारदेखील लॉकडाउनच्या कक्षेत आणले गेले आहेत. कृषी अवजारे व शेतीमालाची विक्री केवळ सकाळी सात ते अकरा या वेळेत करता येणार आहे. 

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर नवी नियमावली जाहीर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे नियम एक मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत लागू असतील. त्यानुसार राज्यातील फळे-भाजी, डेअरी, चिकन-मटण-अंडी-मासे विक्रीची दुकानांपासून ते कृषी अवजारे, शेतीमालाची संबंधित सर्व दुकाने सकाळी ११ वाजल्यानंतर चालू ठेवता येणार नाहीत. केवळ सकाळी ७ ते ११ याच वेळेत संबंधित दुकाने उघडता येतील. 

मुख्य सचिवांनी सर्व किराणा दुकानांना देखील हाच नियम लागू असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र किराणासहित शेतीमालाच्या सर्व वस्तूंची घरपोच सेवा (होम डिलिव्हरी) करण्यास सकाळी ७ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत मान्यता राहील. म्हणजेच आता ग्राहकाला सकाळी ११ वाजल्यानंतर घराबाहेर पडण्यास मज्ज्वाव करण्यात आला आहे. ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी विक्रेत्यांना मात्र ग्राहकांपर्यंत जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

स्थानिक प्रशासनाला आवश्यकता वाटत असल्यास कोणतीही सेवा संबंधित जिल्ह्यापुरती या कठोर नियमावलीत नव्याने समाविष्ट करता येईल. तशी मान्यता राज्य सरकारने दिली आहे. 

...यामुळे कठोर नियमावली 
राज्यातील विविध बाजार समित्या आणि आठवडी बाजारांमध्ये लॉकडाउन कालावधीत तुफान गर्दी होत होती. त्यामुळे सामूहिक अंतर पाळले जात नव्हते. यातून संसर्ग वाढण्यास वाव असल्याची शक्यता कोविड टास्क फोर्सच्या यंत्रणांनी राज्य शासनाकडे व्यक्त केली होती. परिणामी, कृषी व्यवस्था देखील आता लॉकडाउनच्या कठोर नियमाखाली आणली गेली आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली. 


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणच्या काही...
कृषी सेवा केंद्रचालक, कर्मचाऱ्यांना लस...पुणे ः राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेकडो टन कलिंगडे...सिंधुदुर्गनगरी : कोरोना निर्बंधामुळे जिल्ह्यातील...
खानदेशात केळीची कमी दरात खरेदी जळगाव ः खानदेशात नवती केळी बागांची काढणी सुरू...
निर्यातीच्या केळीला १३०० रुपये दर जळगाव ः खानदेशातून आखातात किंवा परदेशात केळी...
शेतीशाळांची ‘एसओपी’ निश्‍चित पुणे ः शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या शेतीशाळांसाठी...
भुईमूग खर्चालाही महागअकोला ः उन्हाळी हंगामात यंदा लागवड केलेल्या...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
जोरदार पावसाची शक्यता पुणे : मराठवाडा ते मध्य प्रदेशचा मध्य भाग या...
बाजार समित्याबंदमुळे खरीप नियोजन ‘...पुणे: कोरोना नियंत्रणासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन...
शेततळे अनुदानाचे वीस कोटी वितरित नगर ः राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या ‘मागेल...
साखर कारखान्यांकडून ९२ टक्के ‘एफआरपी’...कोल्हापूर : राज्यात एप्रिलअखेर एकूण रकमेच्या ९२...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत पुणे : राज्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडत...
उद्योजक वृत्तीतून ‘शिवतेज’ची झळाळीशेती टिकवण्याबरोबरच ती अधिक उद्यमशील करण्यासाठी...
फळप्रक्रिया उद्योजक व्हायचेय? चला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन...
मॉन्सून यंदा वेळेवर पुणे : सध्या मॉन्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक...
शेतकऱ्यांकडे २९ लाख क्विंटल घरचे बियाणे पुणे ः कृषी विभागाने ग्रामबिजोत्पादन मोहिमेतून...
मध्य महाराष्ट्रात तुरळक सरी पुणे : मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत...
पावसाचा प्रभाव वाढणार पुणे : कर्नाटकाच्या उत्तर भागात चक्रीय वाऱ्याची...