agriculture news in Marathi restrictions removed over mahua flowers Maharashtra | Page 2 ||| Agrowon

मोहफुलांवरील दारूबंदी कायद्याचे निर्बंध हटविले 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 मे 2021

मोहफुलांच्या प्रक्रिया उद्योगातून आदिवासी समाजाच्या सशक्तीकरणासाठी दारूबंदी कायद्याचे निर्बंध हटविण्यात आले आहेत. 

पुणे ः मोहफुलांच्या प्रक्रिया उद्योगातून आदिवासी समाजाच्या सशक्तीकरणासाठी दारूबंदी कायद्याचे निर्बंध हटविण्यात आले आहेत. या निर्णयामुळे आता मोहफुले गोळा करणे, बाळगणे, खरेदी, वाहतूक यासाठी परवान्याची आवश्‍यकता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतचा शासन निर्णय गृहविभागाने जारी केला आहे. मात्र परराज्यांतून होणाऱ्या आयातीवर निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत, तर निर्यातीसाठी परवाना आवश्‍यक असणार आहे. 

मोहफुलांच्या संकलन, बाळगणे, खरेदी आणि वाहतुकीसाठी महाराष्‍ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ नुसार निर्बंध घालण्यात आले होते. मात्र या निर्बंधांमुळे मोहफुलांच्या संकलन, विक्रीवर आधारित उपजीविका असणाऱ्या आदिवासी समाजाला अडचणी होत होत्या. निर्बंध हटविण्यासाठी वन विभागाचे तत्कालीन सचिव विकास खारगे यांची समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने दिलेल्या अहवालानुसार आता मोहफुलांवरील निर्बंध हटविण्यात आले आहेत. 

निर्यात परवाना आवश्‍यक 
निर्बंध हटविले असले तरी फुलांच्या परराज्यांतील निर्यातीचे धोरण खुले असले, तरी निर्यात परवाना आवश्‍यक असणार आहे. खासगी व्यक्तींसाठी फुले संकलनाचा वार्षिक कोटा ५०० क्विंटलचा असणार आहे. तर या कोट्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात येणार नसल्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. तर संकलन, साठवणूक आणि विक्रीसाठीचा परवाना गरजेचा राहणार आहे. हा परवाना आदिवासी क्षेत्रातील आदिवासी विकास संस्था, महिला बचत गट, सहकारी संस्था, ग्रामपंचायत यांना घ्यावा लागणार आहे. तसेच या परवान्यांचा गैरवापर होऊ नये यासाठी संबंधित परवानाधारकांकडून बंधपत्र घेतले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा पुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत मॉन्सून...
राज्यात ठिकठिकाणी धुव्वांधार पुणे : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे...
दूध उत्पादकांचे उत्पन्न पोचेल २५...गायी म्हशींमधील लिंग विनिश्‍चित वीर्यमात्रांच्‍या...
धरणक्षेत्रांत पावसाचा जोर पुणे : तीन दिवसांपासून कोकणसह, सह्याद्रीच्या...
सरळ कापूस वाण बियाण्यांचा खानदेशात...जळगाव : खानदेशात केळी पट्ट्यात सरळ वाणांची...
मॉन्सूनची वाटचाल सुरूच पुणे : उत्तर भारतात मॉन्सून दाखल झाल्यानंतर...
कृषी सचिव एकनाथ डवले रमले शिवारात नांदेड : राज्याचे कृषी सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे...
विद्यापीठाच्या कांदा बियाणे विक्रीत ‘...नाशिक/नगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बियाणे...
कृषी पर्यटनातून शेतकऱ्यांना पूरक...पुणे ः सहकार विकास महामंडळाबरोबर झालेल्या...
कोकण, घाटमाथा, विदर्भात अतिवृष्टीचा...पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार...
दूध उत्पादकांना रोज १४ कोटींचा फटका नगर ः लॉककाडउनमुळे दुधाची मागणी घटल्याचे सांगत...
महिला गटाने रुजविले शेती, पूरक...कुशिवडे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) आणि म्हाप्रळ...
डिजिटल सात-बारासाठी ५१ बँकांनी केले...पुणे : शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी डिजिटल...
कांदा बीजोत्पादनात कंपन्याच मालामाल जळगाव : खानदेशात अनेक कांदा बियाणे निर्मात्या...
‘डीएससी’अभावी हजारो कोटी पडून पुणे ः पंधराव्या वित्त आयोगाचा पाच हजार कोटी...
घृष्णेश्‍वर कंपनीची सातत्यपूर्ण उंचावती...एका गटापासून सुरुवात करून विविध उपक्रम, त्यात...
२५ एकरांत शेडनेट्‍स, आदिवासींची सामूहिक...नगर जिल्ह्यात म्हाळुंगी (ता. अकोले) परिसरातील...
विदर्भात पावसाचा जोर पुणे : मॉन्सून उत्तरेकडे सरकत असताना राज्यातील...
लिंबे तोडणीलाही महाग अकोला ः कोरोनामुळे यंदा शेतकऱ्यांना मोठा फटका...
मॉन्सून जोमात, पीककर्ज कोमात पुणे ः दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना...