Agriculture news in Marathi Restrictions on transmitting photos of help in lockdown | Agrowon

नगरमध्ये मदतीचे फोटो प्रसारित करण्यावर प्रतिबंध 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

नगर : शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन काळात स्वयंसेवी संस्था राजकीय पक्ष, नेते, व्यक्‍ती हे त्यांच्यामार्फत फुड पॅकेटस, किराणा किटस, सॅनिटायझर मास्क या स्वरूपाची मदत वाटपाबाबतचे फोटो काढून ते सोशल मीडिया, वर्तमानपत्र, दूरचित्रवाणी यावर प्रसारित करण्यावर प्रतिबंध करण्यात आला आहे. या संदर्भातील आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी काढले आहेत. आदेश मोडला तर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. 

नगर : शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन काळात स्वयंसेवी संस्था राजकीय पक्ष, नेते, व्यक्‍ती हे त्यांच्यामार्फत फुड पॅकेटस, किराणा किटस, सॅनिटायझर मास्क या स्वरूपाची मदत वाटपाबाबतचे फोटो काढून ते सोशल मीडिया, वर्तमानपत्र, दूरचित्रवाणी यावर प्रसारित करण्यावर प्रतिबंध करण्यात आला आहे. या संदर्भातील आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी काढले आहेत. आदेश मोडला तर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. 

शासनाने ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यामधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. 

‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊन आदेशामुळे बंद झालेल्या उद्योग व्यवसायातील प्रभावित झालेले कामगार, परराज्यातील विस्थापित कामगार व बेघर व्यक्‍ती यांच्यासाठी निवारागृह, अन्न, पाणी, वैद्यकीय देखभाल या सुविधा स्वयंसेवी संस्थांच्या साहाय्याने केंद्रीय किचन व्यवस्थेच्या माध्यमातून तयार अन्नाचे पुरवठा करण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आलेला आहे. 

अनेक स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष, नेते, सामाजिक कार्यकर्ते साहित्य, किराणा किटस, सॅनिटायझर मास्क या स्वरूपाची मदत वाटप करीत आहेत. ही मदत वाटप करताना मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत आणि सोशल डिस्टन्स तत्त्वाचे पालन होताना दिसत नाही. तसेच मदत वाटपाबाबतचे फोटो घेऊन सदरचे फोटो हे सोशल मीडिया, वर्तमानपत्र, दूरचित्रवाणी यावर प्रसारित करीत असल्याचे निदर्शनास आल्याने या संदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहेत.

कोणत्याही प्रकारची मदत वाटप करण्यापूर्वी नजीकच्या तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन यांच्याकडून व्यक्‍तिगत व वाहनांचे पासेस प्राप्त करून घ्यावेत. कुठल्याही परिस्थितीत मदत वाटप करणारे व मदत घेणारे यांच्या व्यतिरिक्‍त कोणीही वाटप करताना असू नये. मदत वाटप करणाऱ्यांची संख्या दोन पेक्षा अधिक असू नये. अशा कुठल्याही प्रकारचे मदत वाटपाबाबतचे फोटो प्रसार माध्यमे व सोशल मीडियाव्दारे प्रसारित करू नये. मदत वाटप करताना दोन पेक्षा अधिक व्यक्‍ती आढळल्यास व मदत वाटपाबाबतचे फोटो प्रसार माध्यमे व सोशल मीडियाव्दारे प्रसारित केल्यास फोटोतील सर्व व्यक्‍तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. 
 


इतर बातम्या
वनौषधी लागवडीसाठी निधी असूनही अनास्था पुणे: आयुर्वेदात प्रगत असल्याची जगभर शेखी...
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
भूसंपादनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करा...सोलापूर : ‘‘उजनीच्या पाण्याचा विषय हा...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...