agriculture news in Marathi, The result of agriculture due to weather problems ः Dr. dhawan | Agrowon

हवामानविषयक समस्यांमुळे शेतीवर परिणाम ः डॉ. ढवण
टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मार्च 2019

परभणी ः जागतिक तापमान वाढ, पावसातील अनियमितता, असमान वितरण, अतिवृष्टी, गारपीट आदी हवामानविषयक समस्यांमुळे शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनावर विपरित परिणाम होत आहेत. हवामान बदलाविषयी शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. अशोक ढवण यांनी केले.

परभणी ः जागतिक तापमान वाढ, पावसातील अनियमितता, असमान वितरण, अतिवृष्टी, गारपीट आदी हवामानविषयक समस्यांमुळे शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनावर विपरित परिणाम होत आहेत. हवामान बदलाविषयी शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. अशोक ढवण यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील मध्यवर्ती कृषी संग्रहालयामध्ये कृषी हवामानशास्‍त्र विभागाअंतर्गत ग्रामीण कृषी हवामान सेवा संशोधन प्रकल्प आणि परभणी अॅस्‍ट्रोनॉमिकल सोसायटी यांच्यातर्फे जागतिक हवामान दिनानिमित्त शनिवारी (ता. २३) कार्यक्रमात डाॅ. ढवण बोलत होते.

ग्रामीण कृषी हवामान सेवा प्रकल्पाचे मुख्‍य प्रकल्‍प समन्‍वयक डॉ. कैलास डाखोरे, उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, अॅस्ट्रॅानॅामिकल सोसायटीचे डॉ. रामेश्‍वर नाईक, मध्यवर्ती कृषी संग्रहालयाचे प्रमुख डॉ. राजेश कदम, डॉ. एम. जी. जाधव, डॉ. डी. एम. नाईक आदींची उपस्थिती होती.

श्री. भुसारे म्हणाले, ‘‘कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामान सल्‍ला शेतकऱ्यांना उपयुक्त ठरत आहे.’’ 

प्रास्‍ताविक डॉ. रामेश्‍वर नाईक यांनी केले. सूत्रसंचालन सुधीर सोनुनकर यांनी केले. तर प्रमोद शिंदे यांनी आभार मानले. या वेळी हवामान वेधशाळेशी निगडित उपकरणांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांना हवामान, जलचक्र, तापमान, तापमापी, प्रदूषण, ग्‍लोबल वार्मिंग, रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट, सोलार रेडिएशन, सौर ऊर्जा आदी विषयावर प्रयोगाचे सादरीकरण केले. 

उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रथम पारितोषिक ः पीक वाचवा प्रयोगासाठी, श्रुतीका गडेकर (ओयासिस विद्यालय), द्वितीय ः तापमापक व आर्हतामापक यंत्र पार्थ दराडे (ओयासिस इंग्लिस स्कूल), तृतीय ः रिमोट सेन्सिंग सॅटेलॉईट प्रयोगासाठी कल्‍पेश पत्‍की आणि कल्‍पना पत्‍की (संस्कृती निकेतन) यांना मिळाले. विद्यार्थी व शास्‍त्रज्ञ संवाद हवामान तज्ज्ञांनी विद्यार्थ्‍यांच्‍या हवामानविषयक विविध प्रश्‍नांची उत्तरे दिली.

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...