मराठवाड्यात दूध संकलनावर परिणाम कायम

मराठवाड्यात दूध संकलनावर परिणाम कायम
मराठवाड्यात दूध संकलनावर परिणाम कायम

औरंगाबाद : दूधदरावरून पुकारण्यात आलेल्या आंदोलनाचा दुसऱ्या दिवशीही दूध संकलनावर परिणाम दिसून आला. बीड, उस्मानाबादमधील दूध संकलनावर हा परिणाम सर्वाधिक होता. आंदोलनात्मक पवित्रा मोठ्या प्रमाणात दिसून आला नसला, तरी दूध उत्पादकांनी संकलन केंद्राकडे फिरविलेली पाठ दुग्ध व्यवसाय विकासाच्या दृष्टीने चिंता वाढविणारी आहे.

यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांतील दूध संकलनावर दूधदर आंदोलनाचा परिणाम दुसऱ्या दिवशीही कायम होता. औरंगाबाद जिल्ह्यातही सोमवारी (ता.१६) सकाळी झालेल्या दूध संकलनातील परिणामाचे प्रमाण दुसऱ्या दिवशीही कायम राहून दहा ते पंधरा हजार लिटरची घट औरंगाबाद जिल्ह्यातील दूध संकलनात मंगळवारी (ता. १७) येण्याची शक्‍यता सूत्रांनी व्यक्‍त केली. संकलनात घट आली असली, तरी सोमवारच्या तुलनेत मंगळवारी दुधाच्या विक्रीत वाढ नोंदल्या गेल्याचे सूत्रांनी सांगितले.  

जालना जिल्ह्यातील दूध संकलन सोमवारी झालेल्या १६०० च्या तुलनेत मंगळवारी सकाळी थेट २०० वर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. बीड जिल्ह्यातील दूध संकलनाला खासकरून आष्टी, बीड, गेवराई तालुक्‍यांतील दूध संकलनाला मोठ्या प्रमाणात लागलेला ब्रेक दुसऱ्या दिवशीही कायम होता. दोन संघांकडील जवळपास दोन हजार लिटरचे संकलन वगळता बीड जिल्ह्यातील दूध संकलन जवळपास ठप्पच होते. पाली येथे गुजरातवरून हैदराबादकडे जाणाऱ्या दुधाच्या टॅंकरमधील दूध कॉक खोलून सोडून देण्याची मंगळवारी सकाळी घडलेली घटना व कडा येथे रस्त्यावर दूध ओतून शासनाच्या धोरणाचा निषेध करण्याचे काम शेतकऱ्यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com