मुंबई बाजार समितीत किरकोळ व्यापाऱ्यांना प्रवेश बंद

बाजारात किरकोळ खरेदीदांना आत सोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. बाजारातील गर्दी कमी झाली नाही तर संपूर्ण बाजार खारघर येथे हलवण्यात येईल.
apmc
apmc

मुंबई: मुंबई बाजार समिती प्रशासनाकडून रोज नवनवीन उपयोजना करुन सुद्धा बाजार आवारात गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंग ठेवणे कठीण झाले आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने बाजार विस्तार करण्याचे ठरवले आहे. तसेच बाजारात किरकोळ खरेदीदांना आत सोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. बाजारातील गर्दी कमी झाली नाही तर संपूर्ण बाजार खारघर येथे हलवण्यात येईल.  बाजार समितीविषयक निर्णय कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, बाजार समिती सचिव अनिल चव्हाण आणि इतर अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. ही वाढ लक्षात घेता राज्यात लॉकडाऊन आणि संचारबंदी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर गर्दीची ठिकाणेही बंद करण्यात आली आहेत. या लॉकडाऊनमध्ये शहरातील काही मोठ्या बाजारपेठा मात्र सुरु ठेवण्यात आल्या आहेत. पण या बाजारपेठेतील गर्दी सध्या धोकादायक ठरत आहे. ही गर्दी कमी झाली नाही, तर हा भाजीपाला आणि फळ बाजार वाशी येथून खारघर येथे हलवण्यात येणार आहे.  तसेच बैठकीत इतरही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. गर्दी कमी करण्यासाठी भाजीपाला मंडी एसटी महामंडळाच्या चार एकर मोकळ्या जागेवर २०० हलवण्यात येईल. यामुळे मूळ बाजारात गर्दी कमी होण्यास मदत मिळणार आहे. भाजीपाला आणि फळ बाजाराच्या बाहेर प्रवेशद्वाराजवळ ५०० मीटरपर्यंत १० लेनची मोठी बैरिकेटिंग करण्यात आली आहे. या बैरिकेटिंगच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सिंग प्रणालीचा वापर करुन व्यापारी, कामगारांना आत सोडण्यात येणार आहे. वाशी येथे सोमवारपासून भाजीपाला आणि फळ बाजाराच्या आवारात किरकोळ खरेदीदारांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. आता फक्त होलसेलर यांनाच आत सोडण्यात येणार आहे. त्याच बरोबर आतमध्ये प्रत्येक गाळ्याबाहेर एक मीटरची सोशल डिस्टन्सिंग कठोरपणे पाळण्यात येणार आहे.  नियम तोडतील त्यांचे परवाने रद्द  बाजार समितीत असलेले सर्व घाऊक व्यापारी आणि इतर घटकांनी जर हे नियम तोडले तर भाजीपाला आणि फळ बाजाराच्या जवळ जवळ २००० व्यापाऱ्यांना खारघर येथे सेंट्रल पार्कच्या जवळ ५० ते ६० एकर भूखंडावर दोन ते चार दिवसात पाठवण्यात येणार आहे. वाशी येथे कालपासून भाजीपाला आवारात ३०० गाड्या सोडण्यात येणार आहेत. जे नियम तोडतील त्यांचे परवाने रद्द करण्यात येणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com