वनहक्क दावे रखडले; शेतकऱ्यांना निकालाची प्रतीक्षा

वनहक्क दावे रखडले; शेतकऱ्यांना निकालाची प्रतीक्षा
वनहक्क दावे रखडले; शेतकऱ्यांना निकालाची प्रतीक्षा

नाशिक : मुख्यमंत्र्यांनी वनहक्काचे दावे महिनाभरात निकाली काढण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देऊनही ते काम पूर्ण झालेले नाही. परिणामी, जिल्हाधिकाऱ्यांनी हे दावे निकाली काढण्यासाठी पुन्हा तीन महिन्यांची मुदत संबंधित यंत्रणांना दिली आहे. वृक्ष लागवडीच्या नावाखाली वनहक्क दाव्याची २३०० प्रकरणे वनविभागाकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत धूळ खात पडून आहेत.

वनविभागाच्या पूर्व वनसंरक्षक विभागाकडे ३१३ आणि पश्चिम विभागाकडे १९९१ याप्रामणे २३०४ इतके दावे वनविभागाकडे प्रलंबित आहे. संबंधित ठिकाणी आदिवासी शेतकरी जागा कसत होते की नाही, याचा निर्णय वनविभाग घेते. वनविभागाने अभिप्राय समितीकडे पाठविल्याशिवाय वनपट्टे शेतकऱ्‍यांना मिळण्यात अडचणी आहेत. परंतु, वनविभागाचे अधिकारी वरिष्ठांना दाद देत नाहीत. या संदर्भात एका महसूल अधिकाऱ्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला. मात्र जिल्हाधिकाऱ्यांंनी  असे पत्र देण्याबाबत अधिकाऱ्याला सुनावत वनविभागाच्या अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.

दोन महिन्यांपूर्वीच ही प्रकरणे निकाली निघणे आवश्यक होते. मुख्यमंत्री आणि त्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा करून निकाली प्रकरणाची माहिती मागितली होती. ती देण्यास जिल्हाधिकारी असमर्थ ठरले होते. आता वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आल्याने वनविभागाला या दाव्यांच्या कामाबाबत निमित्तच सापडले आहे. त्यामुळे दावे कधी निकाली लागतात, याची प्रतीक्षा आहे.

जिल्ह्यात ९ हजार ५५१ दावे अमान्य नाशिक जिल्ह्यात प्राप्त ५० हजार ४४३ दाव्यांपैकी २१ हजार १६५ दावे मान्य झाले आहेत. तर ९ हजार ५५१ दावे अमान्य आहेत. जिल्हा समितीकडे ६ हजार ५५० तर, उपविभागस्तरीय समितीकडे १२ हजार ५०३ दावे प्रलंबित आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com