शेतकऱ्यांचे ३० कोटी परत करा; पुण्यात डाळिंब अडत्यांना नोटिसा

APMC Pune
APMC Pune

पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील डाळिंब अडतदारांनी शेतकऱ्यांकडून नियमबाह्य वसुली केलेली हमाली-तोलाईची ३० कोटी ५५ लाख ३३ हजार ८३५ रुपयांच्या वसुलीची नोटीस संबंधित अडत्यांना बजावली आहे. गेल्या दोन वर्षांत चार अडतदारांनी शेतकऱ्यांसह खरेदीदारांकडून नियमबाह्य वसुली केली होती. यामध्ये सर्वाधिक १३ कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस के. डी. चौधरी यांना बजावण्यात आली आहे. तर भाजीपाला विभागातील आणखी ५० अडत्यांची दफ्तर तपासणी सुरू आहे.  याबाबत बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी गुरुवारी (ता. २१) पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. याबाबत बोलताना देशमुख म्हणाले, ‘‘डाळिंब विभागातील चार अडत्यांकडून १ एप्रिल २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ दरम्यान नियमबाह्य हमाली-तोलाई वसुलीच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या. त्यानुसार संबंधित अडत्यांची दोन वर्षांची दफ्तरे ताब्यात घेतली होती. या दफ्तरातील सर्व हिशेबपट्ट्या तपासण्यात आल्या. यासाठी सनदी लेखापालांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार संबंधित अडत्यांवरील वसूलपात्र रकमा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. याबाबतची नोटीस संबंधित अडत्यांना देण्यात आली असून, १५ दिवसांत खुलासा किंवा समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास त्यांचे परवाने रद्द करून, मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.’’ अशा प्रकारचे आणखी भाजीपाला आणि फळ विभागातील ५० अडत्यांची दफ्तर तपासणी सुरू असून, यामध्ये सेस चुकविणे, नियमबाह्य हमाली तोलाई, लेव्ही वसूल करण्याचे प्रकार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.  अडतदार आणि त्यांच्याकडील वसूलपात्र रकमा 

के.डी.चौधरी (गाळा क्रमांक - ८९२) १३ कोटी २१ लाख ८३ हजार ५७५ 
मे. सिद्धरूढ फ्रूट एजन्सी (गाळा क्रमांक - ६६२) ८ कोटी ६० लाख, ८० हजार २०५ रुपये
मे. दिलीप बाळकृष्ण डुंबरे (गाळा क्रमांक ३०२) ४ कोटी ७६ लाख १९ हजार ७२५ रुपये
मे. भास्कर नागनाथ लवटे (गाळा क्रमांक ८८३) ३ कोटी ९६ लाख ५० हजार ३३० रुपये

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com