agriculture news in Marathi return 30 crore of farmers Maharashtra | Page 2 ||| Agrowon

शेतकऱ्यांचे ३० कोटी परत करा; पुण्यात डाळिंब अडत्यांना नोटिसा

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील डाळिंब अडतदारांनी शेतकऱ्यांकडून नियमबाह्य वसुली केलेली हमाली-तोलाईची ३० कोटी ५५ लाख ३३ हजार ८३५ रुपयांच्या वसुलीची नोटीस संबंधित अडत्यांना बजावली आहे. गेल्या दोन वर्षांत चार अडतदारांनी शेतकऱ्यांसह खरेदीदारांकडून नियमबाह्य वसुली केली होती. यामध्ये सर्वाधिक १३ कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस के. डी. चौधरी यांना बजावण्यात आली आहे. तर भाजीपाला विभागातील आणखी ५० अडत्यांची दफ्तर तपासणी सुरू आहे. 

पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील डाळिंब अडतदारांनी शेतकऱ्यांकडून नियमबाह्य वसुली केलेली हमाली-तोलाईची ३० कोटी ५५ लाख ३३ हजार ८३५ रुपयांच्या वसुलीची नोटीस संबंधित अडत्यांना बजावली आहे. गेल्या दोन वर्षांत चार अडतदारांनी शेतकऱ्यांसह खरेदीदारांकडून नियमबाह्य वसुली केली होती. यामध्ये सर्वाधिक १३ कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस के. डी. चौधरी यांना बजावण्यात आली आहे. तर भाजीपाला विभागातील आणखी ५० अडत्यांची दफ्तर तपासणी सुरू आहे. 

याबाबत बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी गुरुवारी (ता. २१) पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. याबाबत बोलताना देशमुख म्हणाले, ‘‘डाळिंब विभागातील चार अडत्यांकडून १ एप्रिल २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ दरम्यान नियमबाह्य हमाली-तोलाई वसुलीच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या. त्यानुसार संबंधित अडत्यांची दोन वर्षांची दफ्तरे ताब्यात घेतली होती.

या दफ्तरातील सर्व हिशेबपट्ट्या तपासण्यात आल्या. यासाठी सनदी लेखापालांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार संबंधित अडत्यांवरील वसूलपात्र रकमा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. याबाबतची नोटीस संबंधित अडत्यांना देण्यात आली असून, १५ दिवसांत खुलासा किंवा समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास त्यांचे परवाने रद्द करून, मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.’’

अशा प्रकारचे आणखी भाजीपाला आणि फळ विभागातील ५० अडत्यांची दफ्तर तपासणी सुरू असून, यामध्ये सेस चुकविणे, नियमबाह्य हमाली तोलाई, लेव्ही वसूल करण्याचे प्रकार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. 

अडतदार आणि त्यांच्याकडील वसूलपात्र रकमा 

के.डी.चौधरी (गाळा क्रमांक - ८९२) १३ कोटी २१ लाख ८३ हजार ५७५ 
मे. सिद्धरूढ फ्रूट एजन्सी (गाळा क्रमांक - ६६२) ८ कोटी ६० लाख, ८० हजार २०५ रुपये
मे. दिलीप बाळकृष्ण डुंबरे (गाळा क्रमांक ३०२) ४ कोटी ७६ लाख १९ हजार ७२५ रुपये
मे. भास्कर नागनाथ लवटे (गाळा क्रमांक ८८३) ३ कोटी ९६ लाख ५० हजार ३३० रुपये

 


इतर अॅग्रो विशेष
भांडवली शेतीचा विळखा बघता बघता हरितक्रांतीला पन्नास वर्षे झाली. तसे,...
पशुखाद्य : नियोजन अन् नियंत्रणमहाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध...
मराठवाड्यात साडेदहा हजार एकरांवर तुतीऔरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर...
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सहा दिवस...मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या...
विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीपंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या...
धानासाठी क्विंटलला पाचशे रुपये अनुदानमुंबई: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा...
‘पीजीआर’ला मान्यतेचा मार्ग मोकळापुणे ः देशभरात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बिगर...
इथेनॉलसाठी मान्यता; पण प्रकल्पांसाठी...पुणे  : थेट साखरेपासून इथेनॉल तयार करण्यास...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून पपईत मिळवली ओळखनंदुरबार जिल्ह्यात धमडाई येथील सुभाष व प्रनील या...
उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः बंगाल उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे...
परिश्रमपूर्वक व्यवस्थापनातून...पुणे जिल्ह्यातील रिहे येथील सुनील शिंदे...
किरकोळ व्यापाऱ्यांकरिता कांदासाठा...मुंबई ः देशात कांद्याचे उत्पादन घटल्याने...
सर्वाधिक दर मोजक्याच कांद्यालानगर ः वाढलेल्या कांदादराचा गेल्या महिनाभरापासून...
पशुखाद्य दर गगणाला भिडलेसांगली ः दुष्काळ व अतिवृष्टीचा फटका पशुखाद्य...
शेवंतीचे तीन वाण लवकरच पुणेः शेतकऱ्यांना शेवंतीच्या पांरपरिक वाणांना...
उत्तर प्रदेशात ‘एसएपी’त बदल नाहीनवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारने सलग दुसऱ्या...
उसाचे ३८ गुंठ्यांत तब्बल १४७ टन उत्पादनकोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील...
कमी कालावधीचा दोडका देतोय चांगला नफागेल्या दोन, तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पुणे...
तापमानात चढ-उतारपुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात असलेले कमी...
जीवघेणा बाजारदेशात बोगस, भेसळयुक्त, अनधिकृत कीडनाशकांचा वापर...