Agriculture News in Marathi The return journey of the monsoon continue | Page 2 ||| Agrowon

मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरूच

टीम अॅग्रोवन
रविवार, 10 ऑक्टोबर 2021

ॡत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. राजस्थानातून परतीची वाटचाल सुरू केल्यानंतर तीनच दिवसांत मॉन्सूनने संपूर्ण उत्तर भारतातून माघार घेतली आहे.

पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. राजस्थानातून परतीची वाटचाल सुरू केल्यानंतर तीनच दिवसांत मॉन्सूनने संपूर्ण उत्तर भारतातून माघार घेतली आहे. शनिवारी (ता. ९) संपूर्ण राजस्थान, उत्तर प्रदेशसह गुजरात, मध्य प्रदेशचा काही भागातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

बुधवारी (ता. ६) पश्चिम राजस्थान आणि लगतच्या गुजरात राज्याच्या काही भागांतून मॉन्सूनने माघार घेतली होती. त्यानंतर दोन दिवसांत शुक्रवारी (ता. ८) वायव्य भारतातून मॉन्सून परतला. शनिवारी (ता. ९) मॉन्सूनने उत्तर भारतातून निरोप घेतला असून, परतीची सीमा मोतीहारी, गया, आंबिकापूर, मांडला, इंदोर, गांधीनगर, राजकोट, पोरबंदरपर्यंत होती. 

मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरू असून, देशाच्या आणखी काही भागांतून वारे परतण्यासाठी पोषक हवामान आहे. मंगळवारपर्यंत (ता. १२) गुजरात, छत्तासगडचा आणखी काही भाग, मध्य प्रदेश झारखंड, बिहारचा बहुतांशी भाग, महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगालच्या काही भागांतून मॉन्सून परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

विजा, मेघगर्जनांसह पावसाचा अंदाज
पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत परतीचा पाऊस पडत आहे. आज (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा, मेघगर्जनांसह पावसाची शक्यता आहे. तर पुणे, सातारा जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
बंगालच्या उपसागरात अंदमान समुद्राजवळ उद्यापर्यंत (ता. ११) हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून ही प्रणाली शुक्रवारपर्यंत (ता. १५) ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत. पूर्व मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती पोषक ठरल्याने महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील राज्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा.
विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
कोकण : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी.
मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
मराठवाडा : बीड, उस्मानाबाद, लातूर.


इतर बातम्या
नगरच्या सहकारावर नागवडे, मुरकुटेंची पकडउस्मानाबाद : नगर ः जिल्ह्यात श्रीगोंदा...
तुरीच्या दरात काहीशी सुधारणाआठवडाभरात तुरीची आवक काहीशी मंदावली होती तसेच...
सोयापेंडच्या सामान्य मागणीमुळे सोयाबीन...बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळी भोवती फिरत...
वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या बैठकीचा बार...वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal)...
जागतिक स्तरावर काजूचा पुरवठा मजबूत...पुणे - २०२२ मध्ये जागतिक स्तरावर काजूचा पुरवठा (...
कशी केली जाणार आहे शेतीमध्ये...शेतीत मूल्यवृध्दीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत...
...तर गावांना मिळणार ५० लाख पुणे - भारतासह जगात गेल्या दोन वर्षांपासून...
मध्यप्रदेश सरकारची शेतकऱ्यांना प्रति...वृत्तसेवा - मध्य प्रदेश सरकारने मुख्यमंत्री...
इतर क्षेत्रांच्या तुलनेत कृषी...यंदाच्या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राने इतर...
महाविकास आघाडी सरकाचा निर्णय...महाविकास आघाडी सरकारने भुमी अधिग्रहण कायद्याला (...
खतांचे वाढीव दर कमी करा मुंबई : अनुदान मिळणाऱ्या खत पुरवठादारांनी...
तापमानात वाढ, गारठा होतोय कमी पुणे : राज्यात अशंतः ढगाळ हवामान असले तरी,...
पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या ...मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा आणि सरकारच्या...
‘सहकार’ला पुन्हा हवे  लेखापरीक्षणाचे...पुणे ः राज्याच्या सहकार चळवळीतील गैरप्रकार...
बदलत्या वातावरणाचे बेदाणा निर्मितीवर...सांगली ः जिल्ह्यात बेदाणा निर्मितीला गती आली आहे...
तुरीच्या दरात काहीशी सुधारणा पुणे ः आठवडाभरात तुरीची आवक काहीशी मंदावली होती....
ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत  डॉ. एन. डी...  कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत,...
विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांचे ...पुणेः कृषी विद्यापीठांमध्ये रोजंदारीवर लागलेल्या...
पपईला मिळेना किलोला ४.७५ रुपयांचाही...जळगाव ः  खानदेशात पपई दर शेतकऱ्यांना...
ऊस तोडणीस विलंब; शेतकऱ्यांत चिंतासातारा ः अवेळी झालेल्या पाऊस, अनेक कारखान्यांची...