agriculture news in marathi Return Monsoon will be advanced from some parts | Page 2 ||| Agrowon

परतीचा मॉन्सून उद्या काही भागातून पुढे सरकणार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

परतीच्या मार्गावर दोन दिवसापूर्वी निघालेला मॉन्सूनसाठी पुढे सरकण्यासाठी पोषकस्थिती आहे. त्यामुळे उद्या (गुरुवारी) पंजाब, राजस्थान, चंडीगड आणि दिल्ली व उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश या भागातून आणखी पुढे सरकणार असल्याची माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली.

पुणे: परतीच्या मार्गावर दोन दिवसापूर्वी निघालेला मॉन्सूनसाठी पुढे सरकण्यासाठी पोषकस्थिती आहे. त्यामुळे उद्या (गुरुवारी) पंजाब, राजस्थान, चंडीगड आणि दिल्ली व उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश या भागातून आणखी पुढे सरकणार असल्याची माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली.

देशाच्या वायव्य भागातील बाहेरच्या बाजूकडील भागात सोमवारी (ता.२८) परतीच्या प्रवासासाठी पोषक असलेली स्थिती झाली होती. त्यामुळे पंजाबच्या अमृतसर, भटिंडा, राजस्थानमधील हनुमानगड, बिकानेर, जैसलमेर या भागापर्यंत मॉन्सूनने माघार घेतली होती. त्यामुळे उत्तर भारतातील उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाना, चंडीगड, दिल्ली, पंजाब, हिमाचलप्रदेश, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान या भागात पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे.

सध्या उत्तर भारतात बिहार आणि हिमालय, पश्चिम बंगाल आणि सिक्किम परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. ही समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. तसेच दक्षिण राजस्थान व उत्तर प्रदेशाच्या ईशान्य भागातही चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे परतीचा मॉन्सून झपाट्याने पुढे सरकण्याची चिन्हे आहेत. या भागातील वातावरणात वेगाने बदल होऊ लागले आहेत. परतीच्या प्रवासामुळे वाऱ्याची दिशा बदलत असल्याची स्थिती आहे. पश्चिम राजस्थानातील चुरू येथे ३९.१ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. तर महाराष्ट्रातील विदर्भात असलेल्या चंद्रपूर येथे सर्वात कमी १९.६ अंश सेल्सिअसची सर्वात कमी तापमान नोंदविले गेले. 


इतर अॅग्रो विशेष
जोरदार पावसाचा अंदाज पुणे ः राज्यात पुढील पाच ते सहा दिवस काही ठिकाणी...
राज्यांचा निर्धार नि केंद्राची माघार‘जीएसटी’ अंतर्गत राज्यांना द्यावयाच्या...
भुकेला भारतजागतिक भूक निर्देशांक-२०२० नुकताच प्रसिद्ध झाला...
बिजोत्पादनातून ‘गौरीनंदन’ची उलाढाल...नगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर (ता. नेवासा) येथील...
पाऊस ओसरला; शेतीकामांत अडथळे पुणे ः गेल्या दोन दिवसांत पावसाने काहीशी...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद २...कोल्हापूर: ‘स्वाभिमानी’ची यंदाची व १९ वी ऊस परिषद...
ओला दुष्काळ जाहीर करुन तातडीने मदत द्या...मुंबई: परतीच्या पावसाने मराठवाडा आणि पश्चिम...
बढत्या देताना गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष पुणे: राज्याच्या कृषी खात्यातील अधिकाऱ्यांना...
उन्हाळ कांद्याची आवक घटली; दरात सुधारणा नाशिक: उन्हाळ कांद्याच्या मागील वर्षी मोठ्या...
`विकेल ते पिकेल’ संकल्पनेत भरिताची...जळगाव ः ‘विकेल ते पिकेल’ संकल्पनेत जिल्ह्यात...
‘जॉईंट ॲग्रेस्को’ ऑनलाइन होणार अकोला ः खरीप हंगामापूर्वी होणारी राज्यातील चार...
किसान रेल्वेने शेतमाल वाहतुकीवर ५०...नागपूर ः किसान रेल्वेच्या माध्यमातून...
मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार ...मुंबई: राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा...
जोरदार पावसाची शक्यता पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात...
पूरक व्यवसायातून स्वयंपूर्णतेचा धडादुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि परसबागेतील...
डोळ्यातल्या पाण्याचे मोलऑ क्टोबरचा दुसरा पंधरवाडा चालू आहे. मूग, उडीद,...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारो हेक्टर...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचा...
मराठवाड्यातील पाऊस ओसरला, नुकसानीचे...औरंगाबाद  ः मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत...
पिकांच्या नुकसानीचे पंचनामे गतीने करा ः...मुंबई: अतिवृष्टी, वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान...
हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी जिल्हानिहाय...परभणी ः राज्यात हंगाम सन २०२०-२१ मध्ये किंमत...