agriculture news in marathi return monsoon will be late this season | Page 2 ||| Agrowon

मॉन्सूनच्या परतीचा मुहूर्त लांबणार

वृत्तसेवा
शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021

नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) राजस्थानातून माघारी परतण्यास अद्यापही पोषक स्थिती नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाचा मुहूर्त आणखी काही दिवस लांबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) राजस्थानातून माघारी परतण्यास अद्यापही पोषक स्थिती नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाचा मुहूर्त आणखी काही दिवस लांबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
मॉन्सूनचे आगमन आणि परतीच्या वेळा ठरविण्यासाठी गेल्या वर्षीपासून हवामान विभागाने नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार १७ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या राजस्थानातून परतीची नवीन सर्वसाधारण तारीख निश्‍चित करण्यात आली आहे. यापूर्वी राजस्थानातून माघारीची तारीख १ सप्टेंबर ठरविण्यात आली होती. मॉन्सूनची संपूर्ण देशातील परतीची सर्वसाधारण तारीख १५ ऑक्टोबर आहे. आणखी आठवडाभर पोषक वातावरण होणार नसल्याने, त्यानंतर मॉन्सूनचा परतीच्या प्रवासाची दिशा ठरणार आहे. 

....असा ठरतो परतीचा प्रवास
वायव्य भारतात असलेल्या पश्‍चिम राजस्थानमधून मॉन्सूनचा परतीचा प्रवासाला सुरुवात होते. यासाठी साधारणत: १ सप्टेंबरनंतर त्या परिसरात सतत पाच दिवस पाऊस थांबणे, समुद्रसपाटीपासून साधारणत: ५ ते ८ किलोमीटर उंचीवर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, सभोवताली बाहेरच्या बाजूला वारे वाहणारी स्थिती असणारी क्षेत्रे (ॲण्टी सायक्लोन) तयार होणे. तसेच त्या परिसरातील आर्द्रतेची टक्केवारी चांगलीच कमी होणे, असे बदल दिसल्यास मॉन्सूनचा राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू झाल्याचे समजले जाते. 

त्यानंतर देशाच्या उर्वरित भागात मॉन्सून परतल्याचे जाहीर करण्यासाठी आर्द्रतेत लक्षणीय घट होणे आणि पाच दिवस पाऊस थांबणे हे वातावरणीय बदल विचारात घेतले जातात. तर मॉन्सून संपूर्ण देशातून परतल्याचे जाहीर करण्यासाठी १ ऑक्टोबरनंतर दक्षिण द्वीपकल्पावर वाऱ्यांची बदललेली दिशा विचारात घेतली जाते. नैर्ऋत्य मोसमी वारे देशातून परतल्यानंतर दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) सक्रिय झाल्याचे जाहीर केले जाते. 

उशिराच होतोय परतीचा प्रवास
गेल्या पाच वर्षांतील मॉन्सूनच्या परतीची वाटचाल पाहता २०१६ मध्ये १५ सप्टेंबर रोजी माघारीस सुरुवात झाली होती. त्यानंतर मात्र मॉन्सूनच्या परतीच्या वाटचाल काहीशी उशिराने होत असल्याचे दिसून आले आहे. २०१७ पासून मॉन्सून सातत्याने सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस राजस्थानातून माघारी फिरत आहे. २०१९ मध्ये तर १९७५ पासूनच्या नोंदीनुसार सर्वांत उशिराने म्हणजेच ९ ऑक्टोबर रोजी मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला होता.


इतर अॅग्रो विशेष
इथेनॉलनिर्मिती १५० कोटी लिटरच्या पुढे...पुणे ः राज्याची एकूण इथेनॉलनिर्मिती क्षमता येत्या...
‘सिबिल’वर ठरतेय कर्जदाराची पतसोलापूर : रिझर्व्ह बॅंकेच्या निकषांनुसार आता...
पूर्णाथडी म्हशीला राजमान्यतेचा प्रस्ताव...अकोला ः पूर्णा नदीच्या खोऱ्यात आढळणाऱ्या फिकट...
देशी गाईंच्या प्रजातींचे संवर्धन गरजेचेपुणे : देशात गाईच्या पारंपरिक जाती नष्ट...
पहिली उचल ३३०० द्यावी ः राजू शेट्टी...कोल्हापूर : यंदा तुटणाऱ्या उसाला पहिली उचल ३३००...
कृषी पदव्युत्तर प्रवेशासाठी १३...पुणे ः राज्यातील कृषी विद्यापीठांमधील पदव्युत्तर...
ट्रॅक्टरचलित विविध यंत्रांद्वारे वेळ,...ट्रॅक्टरचलित यंत्राच्या साह्याने पेरणी वा कोळपणी...
हमीभाव खरेदी केंद्राचा चेंडू राज्य...नागपूर ः भारतीय कापूस महामंडळाने खुल्या बाजारातून...
हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावलाअकोला ः मागील ४८ तासांत वऱ्हाडातील अकोला, वाशीम,...
हेकेखोर विमा कंपन्यांनी वेठीस धरलेपुणे ः शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यासाठी...
खानदेशात केळीला ११८० रुपये दरजळगाव ः खानदेशात केळीचे दर कमी अधिक होत आहेत....
राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यतापुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
नगर जिल्ह्यात निम्म्या सोयाबीनची नासाडीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात...
मॉन्सूनोत्तर पावसाने पुन्हा दाणादाणनाशिक : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या झळा शेतकरी सोसत...
वाहतुकदारांच्या समस्या सोडविणार :... मुंबई : कोविडमुळे आर्थिक संकटात असलेल्या...
दुग्धव्यवसायातून संयुक्त फोलाने...नगर जिल्ह्यात कुकाणे येथील संयुक्त फोलाने...
योग्य व्यवस्थापनातून वाढविला १९०...गोठा, म्हशींचे संगोपन व दूध विक्री या स्तरांवर...
संत्रा छाटणी यंत्र ‘पंदेकृवि’त दाखलअकोला : दिवसेंदिवस या भागात संत्र्याची लागवड वाढत...
‘टॅगिंग’ कपात उपक्रमाच्या यादीत ५३ साखर...पुणे ः थकीत देणी वसूल करण्यासाठी राज्य सरकारने...
शेळीमध्ये टेस्ट ट्यूब बेबीची निर्मितीअकोला ः महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ...