Agriculture news in marathi Return monsoon will leave Rajasthan, Uttar pardhesh tommorrow | Agrowon

परतीचा मॉन्सून उद्या राजस्थान, उत्तरप्रदेशातून माघार घेणार

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020

पुणे : परतीच्या मॉन्सूनसाठी माघारी सरकण्यासाठी पोषक स्थिती आहे. त्यामुळे मॉन्सून वेगाने परतत आहे. उत्तरप्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या वायव्य भागातून उद्या (ता.३) माघार घेणार असल्याची माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली.

पुणे : परतीच्या मॉन्सूनसाठी माघारी सरकण्यासाठी पोषक स्थिती आहे. त्यामुळे मॉन्सून वेगाने परतत आहे. उत्तरप्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या वायव्य भागातून उद्या (ता.३) माघार घेणार असल्याची माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली.

सध्या गुजरातच्या दक्षिण भाग व परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे मॉन्सूनला परतण्यासाठी अनेक भागात आवश्यक असलेले वातावरण तयार होत आहे. मागील तीन दिवसापूर्वी परतीच्या मार्गावर निघालेला मॉन्सूनने चांगलाच वेग घेत आहे. त्यातच वाऱ्याचा प्रवाह बदलल्याने परतीचा मॉन्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. त्यामुळे लवकरच राज्यातही दाखल होण्याची शक्यता आहे.

यंदा परतीच्या पाऊस साधारणपणे १७ सप्टेंबरला माघार परतण्याची तारीख हवामान विभागाने जाहीर केली होती. मात्र, जवळपास बारा ते तेरा दिवस उशिराने मॉन्सूनने आपला मुक्काम हलवला. नियोजित वेळेला मॉन्सून निघाला असता तर राज्यात दाखल होण्याची तारीख पाच आक्टोबर होती. परंतु आता उशिराने मॉन्सून दाखल होणार असला तरी परतण्यासाठी पोषक स्थिती आहे. त्यामुळे वेगाने पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर भारतातील अनेक भागात पावसाची उघडीप असून तापमानात वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसापासून पश्चिम राजस्थानातील चुरू येथे ४०.२ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


इतर बातम्या
सुर्डीतील तरुणांनी तेरा पाझर तलावांना...वैराग, जि. सोलापूर ः ‘वॉटर कप’ स्पर्धेत राज्यात...
धान खरेदी प्रभावित होण्याची शक्यताभंडारा : खरीप हंगामातील धान केंद्र सुरू...
आम्ही तुमच्यासोबत: मुख्यमंत्रीसोलापूर ः सध्या पाऊस थांबला आहे, पण पुढच्या दोन...
कृषी विद्यापीठ कर्मचारी करणार वेतन...नागपूर: सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची...
कापूस विक्रीसाठी नोंदणी थांबविलीजळगाव ः शासकीय केंद्रात कापूस विक्रीसाठी बाजार...
राज्याने जबाबदारी झटकू नये: देवेंद्र...बारामती, जि. पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
कोल्हापुरात नुकसानीचे पंचनामे वेगातकोल्हापूर : जिल्ह्यात आठवडाभर झालेल्या पावसाने...
आटपाडी तालुक्यात चार वेळा अतिवृष्टीआटपाडी, जि. सांगली : बॅंका, विकास सेवा सोसायट्या...
पाच हजार शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांवर सातत्याने...
डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा...मुंबई: डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा जोरदार...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा दणका पुणे ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोकणातही...
‘जीआय’प्राप्त शेतकरी ‘वापरकर्ते’ करणारपुणे: राज्यातील पिकांना भौगोलिक निर्देशांक मिळाले...
तीन दिवसांत मदतीबाबत निर्णय: मुख्यमंत्रीसोलापूर ः हवामान विभागाने आणखी दोन-तीन दिवस...
संत्रापट्ट्यासाठी अनुदानाचे निकष बदलाअमरावती : संत्राबाग कीड-रोग रोगमुक्त ठेवण्यासाठी...
राज्यात पावसासाठी पोषक स्थिती पुणे ः बंगालचा उपसागर व दक्षिण आंध्रप्रदेश...
शेतकऱ्यांना मदतीसाठी कर्जाशिवाय गत्यंतर...तुळजापूर, जि. उस्मानाबाद: स्थानिक लोकांशी...
अकोल्यात ज्वारीच्या कणसातून निघाले कोंबअकोला ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात असमतोल...
जळगावात खपली गहू पेरणी वाढणारजळगाव ः आरोग्यदायी, शेतकऱ्यांना चांगले दर मिळवून...
अकोट येथे उडीद पिकाची प्रतिकात्मक होळीअकोला ः पावसाने पिकांची दाणादाण उडविली आहे....
खानदेशात सोयाबीनचे अनेक शेतकऱ्यांना...जळगाव ः खानदेशात सोयाबीनची पेरणी यंदा बऱ्यापैकी...