agriculture news in marathi, return travel of monsoon starts, pune, maharashtra | Page 2 ||| Agrowon

मॉन्सून राजस्थानातून परतण्यास प्रारंभ

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता. ९) पश्‍चिम राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू केला. उशिरा आगमन झालेल्या मॉन्सूनचा यंदा हा आतापर्यंतचा सर्वांत उशिराने परतीचा प्रवास ठरला आहे. यापूर्वी १९६१ मध्ये १ ऑक्टोबरला मॉन्सूनने पश्‍चिम राजस्थानमधून मुक्काम हलविला होता. परतीच्या प्रवासाला पोषक हवामान असल्याने शुक्रवारपर्यंत (ता. ११) वायव्य आणि मध्य भारतातील आणखी काही भागांतून मॉन्सून परतणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता. ९) पश्‍चिम राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू केला. उशिरा आगमन झालेल्या मॉन्सूनचा यंदा हा आतापर्यंतचा सर्वांत उशिराने परतीचा प्रवास ठरला आहे. यापूर्वी १९६१ मध्ये १ ऑक्टोबरला मॉन्सूनने पश्‍चिम राजस्थानमधून मुक्काम हलविला होता. परतीच्या प्रवासाला पोषक हवामान असल्याने शुक्रवारपर्यंत (ता. ११) वायव्य आणि मध्य भारतातील आणखी काही भागांतून मॉन्सून परतणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाची घोषणा करण्यासाठी सलग पाच दिवस पावसाची उघडीप असणे, हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होणे, हवेचा खालच्या थरात केंद्रभागी दाब अधिक असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती (ॲण्टी सायक्लोनिक सर्क्युलेशन) निर्माण होणे आवश्यक असते. ही स्थिती निर्माण झाल्याने बुधवारी (ता. ९) पंजाब, हरियाना आणि उत्तर राजस्थानमधून मॉन्सून माघारी फिरल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. यापूर्वी १ ऑक्टोबर १९६१ मध्ये सर्वांत उशिराने माघारी फिरला होता. त्यांनतर २००७ मध्ये ३० सप्टेंबरला राजस्थानातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. यंदा या दोन्ही वेळा चुकवून मॉन्सूनने सर्वांत उशिरा ९ ऑक्टोबरला मुक्काम हलविला आहे. 

यंदा मॉन्सून कालावधीत देशात ११० टक्के पाऊस पडला. ११९४ नंतर म्हणजेच २५ वर्षांनंतर देशात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या हंगामात उशिराने झालेले आगमन, पावसाचे प्रमाण, परतीची सुरुवात या सर्वच बाबतीतील विक्रम मोडले गेले आहेत. देवभूमी केरळमध्ये आठ दिवस उशिराने आगमन झाल्यानंतर साधारणत: वेळेच्या पाच दिवस उशिराने (१९ जुलै) मॉन्सूनने देश व्यापला. साधारणत: १ सप्टेंबरला देशातून माघारी फिरणाऱ्या मॉन्सूनने सव्वा महिना अधिक   मुक्काम केला. 

साधारणत: १ ऑक्टोबरला कोकणाचा बहुतांशी भाग, मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागातून मॉन्सून परतत असतो. तर १५ ऑक्टोबरच्या आसपास मॉन्सून देशाचा निरोप घेतो. त्यानंतर दक्षिण भारतातील राज्यांमध्ये ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून (ईशान्य मॉन्सून) साधारणत: १५ डिसेंबरपर्यंत पाऊस पडतो. यंदा मात्र मॉन्सूनचा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला. महाराष्ट्रातून १५ ते २० ऑक्टोबर या कालवधीत मॉन्सून माघारी फिरण्याचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत.

गेल्या काही वर्षांतील मॉन्सूनचा परतीचा प्रवास 
वर्ष तारीख 
२०१४ २३ सप्टेंबर 
२०१५ ४ सप्टेंबर
२०१६ १५ सप्टेंबर
२०१७ २७ सप्टेंबर 
२०१८ २९ सप्टेंबर
२०१९ ९ ऑक्टोबर 

 


इतर अॅग्रो विशेष
जोतिबाच्या खेट्यास प्रारंभ, हजारो भाविक...जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर: जोतिबाच्या खेट्यास...
आर्थिक निर्णयांनी वाढवला प्रियंकाताईंचा...पती गौरव काकडे यांच्या आग्रहावरून पुणे शहरातील...
नियमित कर्जदारांच्या पदरी निराशाचसांगली ः शासनाच्या कर्जमाफीच्या आदेशात अल्प...
शेतकरीच सरकारचा केंद्रबिंदूः उद्धव ठाकरेजळगाव : कर्जमाफी देणे, हा शेतकऱ्यांच्या...
सिंधुदुर्ग जिल्हा कृषी विभागात १०७ पदे...सिंधुदुर्ग: जिल्हा कृषी विभागातील ३६५ पदांपैकी...
अतिवृष्टी, पूरग्रस्तांच्या कर्जमाफीसाठी...मुंबई ः राज्यात जुलै ते ऑगस्ट २०१९ या काळात...
बॅंकांच्या कृषी पतपुरवठ्यावर सरकारचे...नवी दिल्लीः बॅंकांकडून ग्रामीण भागात होणाऱ्या...
चंदनाची सात-बारा उताऱ्यावर नोंद घ्या:...नगर ः शेतकऱ्यांना शेतात चंदन लागवड करण्यास...
खानदेशात कोरड्या चाऱ्याची टंचाईजळगाव  ः खानदेशात चाऱ्याची मोठी टंचाई दिसत...
तंत्रज्ञान, सहकार, बॅंकिंग क्षेत्रात...जर्मनी हा युरोपातील प्रगत देश. तंत्रज्ञान आणि...
जमिनीची सुपीकता जपत पीक उत्पादनात...नाशिक जिल्ह्यातील कारसूळ (ता. निफाड) येथील संकिता...
उन्हाचा चटका, उकाडाही वाढलापुणे : राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने...
संत गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात...शेगाव, जि. बुलडाणा ः विदर्भाच्या पंढरीत शनिवारी (...
आता तरी सोडा धरसोडीचे धोरणसध्या बाजारात तुरीची आवक सुरू झाली असून अपेक्षित...
ग्रामीण विकासाचा ‘पर्यटन’ मार्गगेल्या आठवड्यात गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात...
तापमानात चढ-उतार शक्यपुणे  : उत्तरेकडील थंड वाऱ्याचा अभाव, ढगाळ...
कामाच्या माध्यमातून दिसावे कृषी...नाशिक  : विशिष्ट शेतकऱ्यांसाठीच कृषी विभाग...
अडीच लाख टन कडधान्य बंदरांमध्ये पडूनपुणे  : देशातील कडधान्य बाजारपेठेच्या...
...त्यानंतर बँका, कार्यालयांमध्ये ७/१२...कडेगाव, जि. सांगली  ः राज्यात ऑनलाइन सातबारा...
पाच भावांच्या एकीतून पुढारलेली...ब्राह्मणी गराडा (जि. औरंगाबाद) येथील दुलत...