जिल्हा बॅंकेचे अधिकारी आल्यापावली परत; देवठाणचे शेतकरी आक्रमक

 जिल्हा बॅंकेचे अधिकारी आल्यापावली परत; देवठाणचे शेतकरी आक्रमक
जिल्हा बॅंकेचे अधिकारी आल्यापावली परत; देवठाणचे शेतकरी आक्रमक

येवला ः नाशिक जिल्हा बँकेने कर्जदार शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव करण्याची कारवाई चालू केली आहे. ३१ मे रोजी जळगावनेऊर, चार जून रोजी कोटमगावात शेतकरी संघटनेने आंदोलन करून लिलाव रोखल्यानंतरही नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वसुली पथक शुक्रवारी (ता. ७) देवठाण या गावात आले असता शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना आणि प्रहार शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी जमा झाले. त्यांनी अधिकाऱ्यांना जळगाव नेऊर आणि कोटमगाव येथील घटनेची आठवण दिली.  शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वसुली अधिकारी येण्याआधी सोसायटी कार्यालय, सचिवाला उघडू न देता ठिय्या मांडला. वसुली पथक येताच शेतकरी संघटना आणि प्रहार संघटनेचे पदाधिकारी, देवठाण येथील मोठ्या प्रमाणात जमलेल्या शेतकऱ्यांनी घोषणा देत नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या लिलाव मोहिमेचा निषेध करून अधिकाऱ्यांना शेतकरी कर्ज का भरू शकत नाही या आशयाचे निवेदन दिले. बँकेच्या वसुली पथकाला आल्यापावली परत जायला भाग पाडले.  या वेळी सरपंच मीराताई जानकर, शेतकरी संघटनेचे नेते संतू पाटील झांबरे, बापूसाहेब पगारे, महिला आघाडीच्या निर्मला जगझाप, संध्या पगारे, अरुण जाधव, विठ्ठल वाळके, प्रहार शेतकरी संघटनेचे हरिभाऊ महाजन, वसंत झांबरे, देवठाण गावचे कैलास डुमरे, रवींद्र लावरे, सदाशिव खिल्लारे, दिलीप गोंडे, नाना बोंबले, रघुनाथ वरे, शेकू भाऊ वरे, नामदेव कदम, भरत बोंबले आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com