Agriculture news in marathi Revenue boards continue to be notified in Parbhani district | Agrowon

परभणी जिल्ह्यात महसूल मंडळे अधिसूचित करणे सुरू

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 जानेवारी 2020

परभणी : जिल्ह्यातील महसूल मंडळांची पुनर्रचना करण्यात आल्यामुळे पीकविमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी पीकनिहाय मंडळे अधिसूचित करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये यापूर्वी एकूण ३९ महसूल मंडळे अस्तित्वात होती. पुनर्रचना करण्यात आल्यामुळे प्रत्येक तालुक्यातील महसूल मंडळाच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील महसूल मंडळांची संख्या ५२ पर्यंत वाढली आहे. परभणी, सेलू, पाथरी, गंगाखेड, पूर्णा या पाच तालुक्यांत प्रत्येकी १ मंडळाची भर पडली आहे.

परभणी : जिल्ह्यातील महसूल मंडळांची पुनर्रचना करण्यात आल्यामुळे पीकविमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी पीकनिहाय मंडळे अधिसूचित करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये यापूर्वी एकूण ३९ महसूल मंडळे अस्तित्वात होती. पुनर्रचना करण्यात आल्यामुळे प्रत्येक तालुक्यातील महसूल मंडळाच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील महसूल मंडळांची संख्या ५२ पर्यंत वाढली आहे. परभणी, सेलू, पाथरी, गंगाखेड, पूर्णा या पाच तालुक्यांत प्रत्येकी १ मंडळाची भर पडली आहे.

जिंतूर, मानवत, सोनपेठ, पालम या चार तालुक्यांत प्रत्येकी दोन नवीन मंडळे अस्तित्वात आली आहेत. त्यामुळे पीकविमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी, पीककापणी प्रयोगाचे नियोजन करण्यासाठी मंडळनिहाय विविध पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र निश्चित करण्यात येत आहे. त्यासाठी गेल्या पाच वर्षांतील पेरणी क्षेत्राच्या सरासरीचा आधार घेण्यात आला आहे.

कोणत्याही पिकांचे किमान ३ हजार हेक्टर क्षेत्र असलेली मंडळे अधिसूचित केली जाणार आहेत. त्यापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या मंडळांचे गट तयार केले जाणार आहेत. तूर्त खरीप हंगामातील पिकांसाठी मंडळे अधिसूचित करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर रब्बी हंगामातील मंडळे अधिसूचित करण्याचे काम केले जाईल.

जिल्ह्यात २०१८ पर्यंत सोयाबीनसाठी मंडळ गटानुसार पीककापणी प्रयोग घेतले जात होते. परंतु, सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाल्यामुळे पीककापणी प्रयोगाचे अचूक निष्कर्ष काढण्यासाठी २०१९ मध्ये प्रथम सर्व मंडळांत प्रयोग घेण्यात आले. खरीप हंगामातील ज्वारी, भात, सूर्यफूल आदी पिकांचे क्षेत्र कमी झालेली अनेक मंडळे येत्या काळात या पिकांसाठी अधिसूचित राहणार नाहीत, अशी माहिती 
मिळाली.


इतर ताज्या घडामोडी
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
खानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणारजळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे...
बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी...बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन...नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी,...
शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात :...नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत रिक्तपदांमुळे...रत्नागिरी : मंजूर पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या...
मराठवाड्यात ज्वारीवर चिकटा, मावा;...औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या...
शिवभोजन थाळी योजनेचे पुण्यात उद्‌घाटन पुणे : शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध...नगर  ः  शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५...
सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन...सातारा  : प्रलंबित असलेले जिल्ह्यातील सिंचन...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना ...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
पीकविमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी...मुंबई : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना...
पुण्यात कृषी आयटीआय संस्था सुरू करणार...पुणे : कृषी, सहकार, उद्योग विभागाला चालना...
मराठवाड्यातील पाणीप्रश्नाबाबत...औरंगाबाद  : कुणावर आक्षेप घेण्यासाठी नव्हे;...
पद्मश्री जाहीर होताच हिवरेबाजारमध्ये...नगर ः आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे...
हिवाळी हंगामात पौष्टिक चाऱ्यासाठी करा...बरसीम (शास्त्रीय नावः ट्रायफोलियम...
नगरमध्ये गवार, लसणाच्या दरांत सुधारणा...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण,...
सोलापुरात हिरवी मिरची, वांगी,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...