Agriculture news in Marathi Revenue cases will be settled in three phases | Page 2 ||| Agrowon

महसूली प्रकरणांचा निपटारा तीन टप्प्यांत होणार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 ऑगस्ट 2021

महसूली सेवांच्या संचिकांच्या सादरीकरणाचे तीनस्तर निश्चित करून प्रशासकीय कामकाज गतीमान होणार आहे. महसूल दिनी ही अनोखी भेट जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्हावासीयांना दिली आहे.

नाशिक : सेवाहक्कांतर्गत १००पेक्षा अधिक व राज्यात सर्वाधिक सेवा ऑनलाइन करून विकास प्रशासनात व लोकाभिमुखतेत पथदर्शी ठरणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिनाचे औचित्य साधून अधिनस्त असलेल्या सर्व कार्यालये, शाखांमधून महसूली सेवांच्या संचिकांच्या सादरीकरणाचे तीनस्तर निश्चित करून प्रशासकीय कामकाज गतीमान होणार आहे. महसूल दिनी ही अनोखी भेट जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्हावासीयांना दिली आहे.  

नागरिकांचे व अभ्यागतांचे कार्यालयीन कामकाज जलदगतीने, पारदर्शक व विलंब न करता तत्परतेने केले जाणार आहे. बाबत शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने १४ नोव्हेंबर २०१३ अधिसूचनेनुसार कार्यालयीन कामकाजाच्या कार्यपद्धतीबाबत सूचना दिल्या आहेत. नागरिकांना अधिक कार्यक्षमतेने व जलद सेवा देण्यासाठी अधिकाधिक विषयांमध्ये त्रिस्तरीय कार्यपद्धतीची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखेतील अधिकाधिक विषयांच्या त्रिस्तरीय रचनेची कार्यप्रणाली ही अमलात येणार आहे. कार्यालयाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध महसूली सेवांसाठी निश्चित केलेल्या कालमर्यादेचे पालन न केल्यास व एखाद्या प्रकरणी दप्तर दिरंगाई झाल्यास जबाबदार असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर त्यामुळे दंडात्मक व शिस्तभंगाची कारवाई सुद्धा नियमानुसार केली जाणार असल्याचे श्री. मांढरे यांनी सांगितले. 

बिनशेती नियम ४२ ब व गौणखनीजाशी संबंधित शाखांमधील कामकाजात नागरिकांना मोठा दिलासा यामुळे मिळणार आहे. या शाखांमधील संचिकांच्या मान्यतेचे स्तर कमी केल्याने प्रलंबित राहणाऱ्या प्रकरणांचा निपटारा अत्यंत जलद गतीने होण्यास चालनाही त्यामुळे मिळणार आहे. यापूर्वी चार ते पाच स्तरावरून संचिका हाताळल्या जात असत. ते स्तर कमी करून आता तीन करण्यात आले आहेत. अशाच प्रकारची कार्यपद्धती कुळकायदा शाखा, अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्रामपंचायत निवडणूक शाखेत देखील लागू करण्यात येत आहे.

अशी असेल त्रिस्तरीय सादरीकरण पद्धत 
त्रिस्तरीय रचनेत महसूल लिपिक, सहायक, अव्वल कारकून यांच्यामार्फत प्रथमस्तरावर प्रस्ताव तयार करून सादर केला जाईल. त्यानंतर दुसऱ्या स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत त्याचे पर्यवेक्षण केले जाईल. तिसऱ्या व अंतिम टप्प्यात संचिकेतील प्रस्तावाचे संपूर्ण पर्यवेक्षण करून अंतिम निर्णय घेतला जाईल. हे तीन स्तर निश्चित केल्याने अनावश्यक व वेळखाऊ असलेले संचिकेच्या मान्यतेच्या प्रक्रियेतील स्तर कमी होऊन कामांचा जलदगतीने व निश्चित केलेल्या वेळेत निपटारा होईल.


इतर बातम्या
दहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’नगर ः फळबागा, शेतीपिके आणि पशुसंवर्धनाबाबत ऐनवेळी...
नगर :‘तहसील’मध्ये सोयाबीन ओतून  किसान...नगर : शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात आल्यानतर...
किनवट, हदगाव, माहूरमध्ये पुन्हा पाऊसनांदेड : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून पाऊस...
रब्बीत पंधरा हजार हेक्टरवर  करडई...अकोला : तेलवाण वर्गीय पिकांचे उत्पादन...
नाशिक : शेतकऱ्यांचे संपूर्ण वीजबिल माफ...नाशिक : जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने...
सोयाबीनचे दर दबावाखाली;  ‘स्वाभिमीनी’चे...परभणी : सोयाबीनचे दर कोसळविणाऱ्या राज्य व केंद्र...
ऊसबिले दिल्याशिवाय  गाळप परवाना नको :...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे...
‘नासाका’ सुरू होण्याची प्रक्रिया पुढे...नाशिक रस्ता : नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू...
अकोला :सोयाबीन, कापूस उत्पादक  सततच्या...अकोला : सोयाबीन काढणीला तयार होत असतानाच पावसाची...
कुसुम सौरऊर्जा प्रकल्पातून शेतकऱ्यांना...नाशिक : ‘नापीक आणि अकृषिक जमिनीचा वापर करून...
इंधवे येथील पाझर तलावाची दुरुस्ती होईनापारोळा, जि. जळगाव : इंधवे (ता. पारोळा) येथील पाझर...
पांगरी परिसरात मुसळधारेचा सोयाबीन... पांगरी, ता. बार्शी ः पांगरी भागात...
सौरऊर्जा पंप योजनेचे संकेतस्थळ डाउनऔरंगाबाद : सौरऊर्जेद्वारे कृषिपंप...
मराठवाड्यात पाऊस सुरूच; सोयाबीन, कपाशी...औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा कमी अधिक प्रमाणात...
तंत्रज्ञान प्रसारामध्ये ‘केव्हीके’चा...सोलापूर ः ‘‘तंत्रज्ञान प्रसारामध्ये सोलापूर कृषी...
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...