agriculture news in Marathi revenue department not allow agriculture produce transport Maharashtra | Agrowon

पेट्रोल-डिझेलच्या उपलब्धतेवरून शेतकऱ्यांची अडवणूक

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 एप्रिल 2020

शेतमालाची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी कृषी विभागाने दिलेल्या वाहतूक परवान्याला महसूल विभागाकडून केराची टोपली दाखविली जात आहे.

कोल्हापूर: शेतमालाची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी कृषी विभागाने दिलेल्या वाहतूक परवान्याला महसूल विभागाकडून केराची टोपली दाखविली जात आहे. अनेक ठिकाणी तहसीलदार, पेट्रोलपंप चालक पातळीवर हे परवाने ग्राह्य मानले जात नसल्याची स्थिती आहे. शेतकऱ्यांच्या नावावर अन्य व्यक्तीच इंधन भरुन नेत असल्याने अनेक पेट्रोलपंप चालकांनी केवळ कृषी विभागाच्या पत्रावर इंधन न देण्याचा पवित्रा घेतला आहे. याचा फटका जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना बसत आहे. 

झुलपेवाडी(ता.आजरा) येथील शेतकरी उद्धव माने यांनी अधिकाऱ्यांनी मांडलेल्या या छळाचा लाईव्ह अनुभव ‘ॲग्रोवन’च्या प्रतिनिधीला सांगितला. शनिवारी (ता.११) श्री. माने आपला शेतमाल बाजारात नेत असतानाच उत्तूरच्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी (सर्कल) त्यांचा शेतमाल अडविला. सर्कलना कृषी विभागाने दिलेला परवाना दाखवताच हा परवाना चालत नसल्याचे सांगितले. श्री. माने यांनी पुढील पेट्रोलपंपावर जाऊन शेतमाल वाहतुकीसाठीच्या वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी प्रयत्न केले. येथेही या परवान्याचा उपयोग झाला नाही. महसुलाच्या अधिकाऱ्यांनी पेट्रोलपंप धारकास शेतकऱ्यांकडून हा परवाना ठेवून घेण्यास सांगितले. 

हतबल झालेल्या श्री. माने यांनी संपर्कातील कृषी अधिकाऱ्यांशी फोनद्वारे संपर्क साधून त्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. या अधिकाऱ्यांनी तहसीलदारांशी संपर्क साधून परवान्याबाबत नेमकी माहिती देण्याचे आश्‍वासन दिले. शेतकऱ्यांच्या नावावर अन्य व्यक्तीच इंधन नेत असल्याने आम्ही पेट्रोल भरण्याची परवानगी देऊ शकत नसल्याने महसुलाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तोडगा म्हणून फक्त कृषी विभागाने परवाना दिलेले चारचाकी वाहन आणा फक्त डिझेल देतो पण पेट्रोल देणार नाही अशी भूमिका पेट्रोलपंप चालकांनी घेतली.

दोन्ही विभागांनी समन्वयाने काम करावे 
शासनाने कृषीच्या कामांना लॉकडाऊन मध्ये सूट दिली आहे. अनेक लहान शेतकऱ्यांकडे चारचाकी वाहन नसल्याने ते स्वत:चा दुचाकीवर शेतमाल ठेवून विकत असल्याची स्थिती आहे. पण महसूल विभागाकडून होणारी अडवणूक ही निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया श्री. माने यांनी नोंदविली. दोन्ही विभागांनी समन्वयाने काही अटी शर्ती लावून तरी दुचाकीसाठी कोणत्याही पेट्रोलपंपावर इंधन उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी यावेळी श्री. माने यांनी केली. 


इतर अॅग्रो विशेष
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...
वऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...
मध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...
पावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...
सांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...
`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...