दोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ जानेवारी अर्थात प्रजासत्त
ताज्या घडामोडी
पंचनामे उद्यापर्यंत पूर्ण करा : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे ः अतिवृष्टीने बाधित झालेल्या सर्वच पिकांचे पंचनामे बुधवारपर्यंत (ता. ६) पूर्ण करावेत, असे आदेश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला दिले. नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला भरपाई देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. पुरंदर तालुक्यातील पीक नुकसानीची पाहणी मंत्री पाटील यांनी सोमवारी (ता. ४) केली. त्यानंतर पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्यांतील पीक नुकसानीचा आढावा सासवड येथे आयोजित बैठकीत घेतला. या वेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, दादासाहेब कांबळे, तहसीलदार रूपाली सरनोबत, सोनाली मेटकरी, विजय पाटील आदी उपस्थित होते.
या वेळी मंत्री पाटील म्हणाले, की बाधित क्षेत्रांचे तत्काळ पंचनामे करण्यासाठी पथके वाढविण्यात यावीत. शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी बुधवारपर्यंत पंचनामे पूर्ण करण्यात यावेत. पीक नुकसानीची भरपाई देण्यासाठी प्राथमिक स्तरावर १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उर्वरित मदत केंद्र सरकारकडे मागण्यात येणार आहे. हे शेतकऱ्यांचे सरकार असून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असेही ते म्हणाले.
दरम्यान, मंत्री पाटील यांनी सकाळी पुरंदर तालुक्यातील भिवरी, बोपदेव, चांबळी, हिवरे येथील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
- 1 of 1030
- ››