प्रतिजनावरासाठी ११० रुपयांपर्यंत  अनुदान देणार ः चंद्रकांत पाटील

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

सोलापूर  : दुष्काळग्रस्त भागातील जनावरांसाठी छावण्या व जनतेला पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी मागेल, त्या ठिकाणी टॅंकर पुरवठा करण्याची जबाबदारी शासनाची आहे. आम्ही ती पूर्ण करत आहोतच, पण जनावरांच्या छावण्या आणि त्यातील सोयी-सुविधांबाबतही आम्ही जागरूक आहोत, आम्ही छावणीतील प्रती जनावराला सध्या ९० रुपये अनुदान देत असून, आता ते ११० रुपये करण्याचा विचार आहे, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

सांगोला तालुक्‍यामध्ये लोटेवाडी, कडलास, घेरडी, मंगळवेढ्यातील भोसे, रड्डे, मोहोळ तालुक्‍यांतील देवडी, माढ्यातील तुळशी भागातील जनावरांच्या छावण्यांना महसूलमंत्री पाटील यांनी भेट दिली. त्यांच्यासमवेत पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी आमदार शहाजी पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख, राजश्री नागणे आदी उपस्थित होते.

कडलास येथील छावणीवर पशुपालकांशी चर्चा करताना श्री. पाटील म्हणाले, की युतीच्या सरकारने नोव्हेंबरमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. आजवरच्या सरकारने एप्रिल-मार्चच्या अगोदर कधीही दुष्काळ जाहीर केला नाही. तेच आता दुष्काळात जनतेला कळवळा आणून दुष्काळ पडला त्या वेळी आम्ही शेतकऱ्यांना मदत केली असे सांगत आहेत. सध्या दुष्काळग्रस्त पाच हजार गावांमध्ये पाच हजार ६७५ टॅंकरद्वारे पिण्याचा पाणीपुरवठा केला जात आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना ३२ हजार कोटी रुपयांचा विमा दिला आहे. अजूनही शेतकऱ्यांच्या नावे विम्याचे पैसे दिले जात आहेत. एक लाख एकरांवर चारा पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे व खते दिली आहेत. यामुळे जून अखेरपर्यंत चारा कमी पडणार नाही, असेही ते म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com