दूध वाहतूक करणारा रेल्वे डबा
दूध वाहतूक करणारा रेल्वे डबा

दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख उत्पन्न 

दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून दिल्ली येथे होणाऱ्या दुधाच्या वाहतुकीतून रेल्वेला भाडेपट्टीपोटी सात महिन्यांत ६ कोटी १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. 

दौंड येथून दिल्लीकरिता थेट रेल्वेची सुविधा असल्याने पुणे, नगर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांमधून प्रक्रिया केलेले दूध संकलित ट्रक-टॅंकद्वारे दौंड येथील मालधक्का येथे आणले जाते. तेथे डिझेल पंपांच्या साह्याने टॅंकरमधील दूध रेल्वेच्या टॅंकमध्ये भरण्यात येते. सदर दूध दिल्ली येथील नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या (एनडीडीबी) मदर डेअरी व होडल (हरियाना) येथे पाठविले जाते. सध्या दिवसाला सरासरी प्रत्येकी चाळीस हजार लिटर क्षमतेचे दोन टॅंक थेट दिल्लीला रवाना केले जात आहेत. दक्षिणेतून दिल्लीकडे जाणाऱ्या सुपरफास्ट प्रवासी गाड्यांना दौंड येथून दुधाचे टॅंक जोडले जात असून, साधारणपणे चोवीस तासांत हे टॅंक दिल्लीत पोचतात. 

दौंड रेल्वे स्थानकाला दूध वाहतुकीतून सरासरी महिन्याला ८७ ते ८८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. १ डिसेंबर २०१८ ते ३० जून २०१९ दरम्यान दुधाच्या वाहतुकीतून रेल्वेला एकूण ६ कोटी १२ लाख ३६ हजार ७९३ रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती स्टेशन व्यवस्थापक सॅम्युएल क्‍लिफ्टन यांनी दिली.    १.८९ कोटी लिटर दुधाची वाहतूक  दौंड येथून दिल्लीला डिसेंबर २०१८ ते जून २०१९ पर्यंत ४६१ टॅंकरच्या माध्यमातून १ कोटी ८९ लाख ९८ हजार ४०० लिटर दूध पाठविण्यात आले. दौंड ते दिल्ली वाहतुकीसाठी एका टॅंकचे भाडे सरासरी १ लाख २० हजार ते १ लाख ३० हजार रुपये इतके असून ते अंतरावर अवलंबून आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com