agriculture news in marathi, revenue to railway department for milk carrier, pune, maharashtra | Agrowon

दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख उत्पन्न 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून दिल्ली येथे होणाऱ्या दुधाच्या वाहतुकीतून रेल्वेला भाडेपट्टीपोटी सात महिन्यांत ६ कोटी १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. 

दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून दिल्ली येथे होणाऱ्या दुधाच्या वाहतुकीतून रेल्वेला भाडेपट्टीपोटी सात महिन्यांत ६ कोटी १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. 

दौंड येथून दिल्लीकरिता थेट रेल्वेची सुविधा असल्याने पुणे, नगर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांमधून प्रक्रिया केलेले दूध संकलित ट्रक-टॅंकद्वारे दौंड येथील मालधक्का येथे आणले जाते. तेथे डिझेल पंपांच्या साह्याने टॅंकरमधील दूध रेल्वेच्या टॅंकमध्ये भरण्यात येते. सदर दूध दिल्ली येथील नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या (एनडीडीबी) मदर डेअरी व होडल (हरियाना) येथे पाठविले जाते. सध्या दिवसाला सरासरी प्रत्येकी चाळीस हजार लिटर क्षमतेचे दोन टॅंक थेट दिल्लीला रवाना केले जात आहेत. दक्षिणेतून दिल्लीकडे जाणाऱ्या सुपरफास्ट प्रवासी गाड्यांना दौंड येथून दुधाचे टॅंक जोडले जात असून, साधारणपणे चोवीस तासांत हे टॅंक दिल्लीत पोचतात. 

दौंड रेल्वे स्थानकाला दूध वाहतुकीतून सरासरी महिन्याला ८७ ते ८८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. १ डिसेंबर २०१८ ते ३० जून २०१९ दरम्यान दुधाच्या वाहतुकीतून रेल्वेला एकूण ६ कोटी १२ लाख ३६ हजार ७९३ रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती स्टेशन व्यवस्थापक सॅम्युएल क्‍लिफ्टन यांनी दिली. 
 
१.८९ कोटी लिटर दुधाची वाहतूक 
दौंड येथून दिल्लीला डिसेंबर २०१८ ते जून २०१९ पर्यंत ४६१ टॅंकरच्या माध्यमातून १ कोटी ८९ लाख ९८ हजार ४०० लिटर दूध पाठविण्यात आले. दौंड ते दिल्ली वाहतुकीसाठी एका टॅंकचे भाडे सरासरी १ लाख २० हजार ते १ लाख ३० हजार रुपये इतके असून ते अंतरावर अवलंबून आहे.
 


इतर बातम्या
कोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी...कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने...
बार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसानवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात...
'साखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...
`पागंरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल...पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा,...
परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी...परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९...
खानदेशातील सव्वालाख क्विंटल हरभरा...जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू...
खानदेशात केळीची उधारीने खरेदीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात...
साखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...
नाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार...नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात...
मराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेनाऔरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार...
मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची पीक...औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात...
कांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा...नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय...
लातूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे...लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...
नांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर...नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील...
वऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या...
शेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या...यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या...
सिंधुदुर्गाच्या काही भागात मुसळधार सुरूचसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर...
सांगलीत रब्बीसाठी ३३ हजार क्विंटल बियाणेसांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह...
निळवंडे धरण तुडुंबअकोले, जि. नगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान...
कोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....